• Latest
  • Trending
नाशिकच्या पालकमंत्री पदी गिरीश महाजन ?

नाशिकच्या पालकमंत्री पदी गिरीश महाजन ?

December 6, 2024
शुद्ध हवा विसरा… नाशिकची  हवा ‘अस्वस्थ’ करणारी

शुद्ध हवा विसरा… नाशिकची हवा ‘अस्वस्थ’ करणारी

October 16, 2026
त्र्यंबकेश्वरमध्ये 31 फूट सिंहस्थ ध्वजस्तंभाचे पूजन

त्र्यंबकेश्वरमध्ये 31 फूट सिंहस्थ ध्वजस्तंभाचे पूजन

October 15, 2026
पक्षासाठी लढणाऱ्या कार्यकर्त्यांना कधी मिळणार पदे ?

पक्षासाठी लढणाऱ्या कार्यकर्त्यांना कधी मिळणार पदे ?

October 15, 2026
नासिक मध्ये दोन कोटींचा रुग्ण घोटाळा तीन हॉस्पिटल्स वर गुन्हा दाखल

नासिक मध्ये दोन कोटींचा रुग्ण घोटाळा तीन हॉस्पिटल्स वर गुन्हा दाखल

October 14, 2026
जिनिव्हाच्या जागतिक मंचावर घुमला नाशिकच्या महापौरांचा आवाज

जिनिव्हाच्या जागतिक मंचावर घुमला नाशिकच्या महापौरांचा आवाज

October 13, 2026
नाशकात शिंदे गटाच्या नेत्यावर कोयत्याने हल्ला

कायद्याच्या बालेकिल्ल्यात तरुणांवर कोयत्याने आणि पेवर ब्लॉक ने हल्ला

October 13, 2026
नाशिकच्या कार्यक्रमात मुख्यमंत्री पोलिसांवर नाराज…

नाशिकच्या कार्यक्रमात मुख्यमंत्री पोलिसांवर नाराज…

October 11, 2026
नाशिक आणि त्र्यंबकेश्वरचा  कायापालट होणार-मुख्यमंत्री

नाशिक आणि त्र्यंबकेश्वरचा कायापालट होणार-मुख्यमंत्री

October 11, 2026
भविष्यात गणेश आणि नवरात्र उत्सव मंडळांची संख्या कमी होण्याची शक्यता ?

भविष्यात गणेश आणि नवरात्र उत्सव मंडळांची संख्या कमी होण्याची शक्यता ?

October 11, 2026
नाशिकच्या खड्ड्यांनी घेतला तेरावा बळी; नातेवाईकांचा आरोप

नाशिकच्या खड्ड्यांनी घेतला तेरावा बळी; नातेवाईकांचा आरोप

October 9, 2026
‘नटसम्राट’ची एक्झिट! ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांचे निधन

‘नटसम्राट’ची एक्झिट! ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांचे निधन

October 8, 2026
महापालिकेत “उद्यान” घोटाळा

महापालिकेत “उद्यान” घोटाळा

October 7, 2026
News Black & White
Sunday, October 18, 2026
  • Home
  • महाराष्ट्र
  • देशविदेश
  • क्रीडा
  • राजकीय
  • विविध
  • शेअर बाजार
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • संपादकीय
No Result
View All Result
News Black & White
No Result
View All Result

नाशिकच्या पालकमंत्री पदी गिरीश महाजन ?

YOU MAY ALSO LIKE

शुद्ध हवा विसरा… नाशिकची हवा ‘अस्वस्थ’ करणारी

त्र्यंबकेश्वरमध्ये 31 फूट सिंहस्थ ध्वजस्तंभाचे पूजन

जिल्ह्यावर नियंत्रण ठेवण्यासाठी महायुती मध्ये जोरदार रस्सीखेच

नाशिक : राज्यात महायुती बहुमताने सत्तेत आली आणि काही दिवसांच्या प्रतीक्षेनंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तर उपमुख्यमंत्री म्हणून एकनाथ शिंदे, अजित पवार यांनी शपथ घेतली. आता मात्र नाशिक जिल्ह्याच्या पालकमंत्री पदी कोण ? याची जोरदार चर्चा राजकीय वर्तुळात आहे. काल-परवा तर काही कार्यकर्त्यांनी आपापल्या नेत्यांचे भावी पालकमंत्री म्हणून शहरात फलक झळकावले यामध्ये प्रामुख्याने छगन भुजबळ, दादा भुसे, देवयानी फरांदे यांचे कार्यकर्ते अग्रभागी होते. संपुर्ण जिल्हावार नियंत्रण मिळवायचे असेल तर आपल्याच पक्षाला पालकमंत्री पद मिळावे अशी सर्वच राजकीय पक्षांची इच्छा असते. सध्या जिल्हात सात जागा जिंकून अजित पवार गटाच्या राष्ट्रवादीने आपली “दादागिरी” सिद्ध केली आहे.तर भाजपचे पाच आमदार निवडून आले आहेत. त्याखालोखाल शिंदे गटाच्या शिवसेनेचे दोन आमदार आहेत. या प्रमुख तीन पक्षांनी स्ट्राइकरेट टिकून ठेवल्याने नाशिक जिल्ह्याच्या पालकमंत्री पदासाठी या तीनही पक्षांमध्ये जोरदार रस्सीखेच होण्याची शक्यता आहे. 2014 मध्ये देवेंद्र फडणवीस राज्याचे मुख्यमंत्री असताना गिरीश महाजन नाशिक जिल्ह्याचे पालकमंत्री होते. त्यानंतर राजकीय उलथापालथ झाली आणि एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाल्यानंतर दादा भुसे हे जिल्ह्याचे पालकमंत्री झाले. मात्र आता भाजपचे देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असल्याने गिरीश महाजन हेच पालकमंत्री होण्याची दाट शक्यता आहे. अजीत पवार गटाच्या राष्ट्रवादीला तोला-मोलाचे मंत्रिपद दिले जाईल तर जिल्हात शिंदे गटाच्या शिवसेनेचे दोन आमदार असल्याने एकाला मंत्रिपद दिल्यास पालकमंत्री साठी भाजपचा मार्ग मोकळा होऊ शकतो. त्याचबरोबर 2026-27 मध्ये होणाऱ्या सिहस्थ कुंभमेळा जिल्हास्तरीय समितीचे अध्यक्षपद गिरीश महाजन यांच्याकडे आहे. जिल्हात पालकमंत्री भुसे असताना देखील अध्यक्ष पद गिरीश महाजन यांच्याकडे गेले होते. त्याचबरोबर गिरीश महाजन यांची ओळख फडणवीस याचे संकटमोचक म्हणून असल्याने आणि ज्या पक्षाचा मुख्यमंत्री त्याचाच पालकमंत्री ही शक्यता लक्षात घेता पुन्हा एकदा नाशिक जिल्ह्याचे पालकमंत्री पद गिरीश महाजन यांच्याकडे जाण्याची शक्यता आहे.

Loading

Previous Post

मुख्यमंत्री फडणवीस यांची पहिल्या फाईलवर पहिली सही

Next Post

इंदिरानगरच्या जॉगिंग ट्रॅकमध्ये पहाटे एमडी ड्रग्ज जप्त

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Search

No Result
View All Result
  • About
  • advertise
  • Privacy & Policy
  • Contact Us

© 2024 Black & White

No Result
View All Result
  • Home
  • महाराष्ट्र
  • देशविदेश
  • क्रीडा
  • राजकीय
  • विविध
  • शेअर बाजार
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • संपादकीय

© 2024 Black & White