महिला आमदारांची माहिती केंद्रीय नेतृत्वाने मागविली

नाशिक : विधानसभेच्या निवडणुकीत महायुतीला मोठे यश मिळाले तर महाविकास आघाडीचे सत्तेचे स्वप्न भुईसपाट झाले. हे सर्व झाले लाडक्या बहिणींमुळे .महायुतीला महिला वर्गाने मोठ्याप्रमाणात साथ दिल्याने राज्यात महायुतीची सत्ता आली त्याचबरोबर भाजपच्या 132 पैकी महिला आमदार या 14 आहेत यामध्ये देवयानी फरांदे,सीमा हिरे, श्वेता महाले,मेघना बोर्डीकर,मंदा म्हात्रे,विद्या ठाकूर,मनीषा चौधरी, या सर्व अनुभवी आमदार असून स्नेहा पंडित,श्रीजया चव्हाण, असे भाजपचे नवीन चेहरे देखील विधानसभेत गेले आहेत. यातील काही आमदार या सातत्याने निवडून गेल्या असून मध्य नाशिक मतदारसंघाच्या आमदार देवयानी फरांदे या विधानसभेत तिसऱ्यांदा निवडून जात त्यांनी हॅट्रिक केली आहे. त्याचबरोबर हिंदू-मुस्लिम संमिश्र वस्ती असलेल्या मतदारसंघात त्यांच्या पुढे ठाकरे गटाच्या शिवसेनेचे उमेदवार वसंत गिते यांचे तगडे आव्हान असताना देखील त्यांनी विजयश्री खेचून आणत मतदारसंघात निवडणून येण्याचा इतिहास रचला आहे. त्यामुळे आमदार देवयानी फरांदे यांची कॅबिनेट मंत्रीपदी वर्णी लागण्याची शक्यता आहे. या सर्व महिला आमदारांची माहिती केंद्रीय नेतृत्वाने मागवल्याचे सूत्रांकडून समजते आहे.दिल्लीतूनच सर्व मंत्रीपदांवर शिक्कामोर्तब होणार असल्याची चर्चा आहे.महिलांना मंत्रिमंडळात स्थान दिल्यास महिलांचे प्रश्नांना न्याय मिळू शकेल. आणि महिला वर्गामध्ये एक चांगला मेसेज सुद्धा जाऊ शकतो. हाच विचार भाजप नेतृत्वाच्या डोक्यात असण्याची शक्यता व्यक्त केली

![]()












