सिडकोची घरे फ्री होल्ड करा मात्र तोपर्यंत कार्यालय सुरू ठेवा

नाशिक: सिडकोतील लीज होल्डने दिलेली घरे फ्री होल्ड करण्याच्या मागणीला शेवटी यश आले असून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी अखेरीस यासंदर्भात निर्णय घेतला आहे. या निर्णयाचे सिडको परिसरातील मा नगरसेवक व शिंदे गटाच्या शिवसेनेचे शहर अध्यक्ष प्रवीण (बंटी ) तिदमे यांनी स्वागत केले आहे . सिडकोतील घरे बांधल्यानंतर ती लीजने देण्यात आली होती सिडको ने 99 वर्ष कराराने पंचवीस हजार घरे विकली असून सुमारे 5000 वेगवेगळ्या वापराचे भूखंड देखील लिजने दिले आहेत. त्याचप्रमाणे वेगवेगळ्या ठिकाणी सुमारे दीड हजार टपऱ्या व भूखंड देखील वाटप केली आहेत. मात्र ही घरे लीज होल्डने दिलेली असल्याने त्यातील बांधकाम किंवा अन्य काही कारणासाठी घरमालकांना सिडकोत धाव घ्यावी लागते तसेच शुल्क देखील भरावे लागते मध्यंतरी शासनाने सिडकोचे कार्यालय संभाजीनगरला स्थलांतरित केल्यानंतर त्याला याच कारणामुळे विरोध झाला होता. आणि काही कामे करायची असतील तर मुख्य कार्यालयात चकरा मारायच्या का असा प्रश्न केला जात होता . मात्र मा.नगरसेवक प्रवीण तिदमे यांच्या 22 महिन्याच्या संघर्षाला मोठे यश प्राप्त झाले असून अखेर काही दिवसांपूर्वी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी नाशिक शहरात दिलेला शब्द पूर्ण करत सिडकोतील घरे फ्री होल्ड करण्याचा निर्णय मुख्यमंत्री शिंदे यांनी घेतला आहे.

सिडकोने ‘लिज होल्डने’ दिलेली घरे ‘फ्री होल्ड’ करून घरधारकांना संपूर्ण मालकी मिळेपर्यंत सिडको प्रशासकीय कार्यालय सुरूच ठेवण्याची मागणी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांच्याकडे करण्यात आली असून यासंदर्भात मुख्यमंत्री शिंदे यांना निवेदन देण्यात आले आहे – प्रवीण तिदमे (शहर अध्यक्ष ,शिंदे गट शिवसेना)

![]()











