उग्र आंदोलनाचा दिला इशारा

नाशिकरोड : या परिसरातील बिटको बॉईन्ट ते जेलरोड या रस्त्यांवर तसेच प्रभागातील अनेक भागांमध्ये काही दिवसांपूर्वी गॅस पाईप लाईन टाकण्यासाठी सर्वच रस्ते खोदण्यात आले होते. मात्र रस्ते खोदकाम झाल्यानंतर रस्ता व्यवस्थित न बुजवता फक्त खोदकाम केलेल्या ठिकाणी मुरूम टाकून रस्त्यांची डागडुजी करण्यात आल्याने महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या कार्यकर्त्यानी संताप व्यक्त केला आहे. मनसेने यासंदर्भात आवाज उठवल्यानंतर जागे झालेल्या ठेकेदाराने घाईघाईने रस्त्यांचे डांबरीकरण केले. यामुळे काही ठिकाणी खड्डे तर काही ठिकाणी उंचवटे निर्माण झाल्याने त्यात पावसाळा सुरू असल्याने अनेक ठिकाणी पाणी साचण्याची समस्या निर्माण झाली आहे. यामुळे रस्त्यांवरती जाणाऱ्या येणाऱ्या नागरिकांना याचा प्रचंड त्रास सहन करावा लागत आहे. यामुळे संतप्त झालेल्या मनसे पदाधिकारी व कार्यकर्त्यानी आज नाशिकरोड येथील महानगरपालिकेच्या प्रवेशद्वारासमोर खडी ओतून अभिनव आंदोलन करत विभागीय अधिकाऱ्यांना निवेदन देत यापेक्षा उग्र आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला. यावेळी मनसेचे शहर संघटक अँड नितीन पंडित, विभाग अध्यक्ष साहेबराव खर्जुल,प्रमोद साखरे,विनायक पगारे, बाजीराव मते, शशी चौधरी, नितीन धानापुणे, भानुमती आहिरे,मीरा आवारे,विजय बोराडे आदी उपस्थित होते

![]()














