गुंडगिरी वाढल्याने नाशिकरोड परिसरातील नागरिक दहशतीखाली

नाशिक: नाशिकरोड परिसरात काही दिवसांपूर्वी मा नगरसेविकेच्या पती वर हल्ला झाल्याचे प्रकरण ताजे असतानाच. काल रात्री पुन्हा माजी नगरसेवकाला रस्त्यात अडवून मारहाण केल्याने परिसरात खळबळ उडाली आहे. नाशिकरोड परिसरातील माजी नगरसेवक अँड सुनील बोराडे व त्यांचे मित्र सुनील परदेशी हे रात्री नऊ वाजेच्या सुमारास विहितगाव वडनेर रोडवरील एका मंगल कार्यालयात माजी नगरसेवक मणियार यांच्या मुलाच्या लग्नाच्या रिसेप्शनला गेले होते. तेथून गाडीने आगरटाकळी भागात जाण्यास निघाले मात्र बोराडे यांचे मित्र परदेशी यांना विहीतगाव मनपा शाळेपर्यंत आल्यावर या मार्गे जाणे लांब पडेल म्हणून ते जय भवानी रोड मार्गे जाण्यासाठी गाडी वळवत असताना यादरम्यान तोंडाला रुमाल बांधलेल्या तीन-चार युवकांनी बोराडे यांची गाडी थांबवत बोराडे व परदेशी यांना त्या युवकांनी मारहाण करण्यास सुरुवात केली व शिवीगाळ करू लागले. मात्र बोराडे यांनी आपली ओळख सांगण्याचा प्रयत्न केला तरीदेखील त्या युवकांनी मारहाण सुरूच ठेवली. यावेळी बोराडे यांनी गाडीतूनच त्या युवकांना प्रतिकार करण्यास सुरुवात केली. त्या ठिकाणी नागरिकांची गर्दी जमू लागली. यावेळी बोराडे गाडीबाहेर निघण्याचा प्रयत्न करत असतानाच हल्ला करणारे ते चौघेजण वेगवेगळ्या दिशेने पळून गेले .यादरम्यान त्यांच्या गाडीची चावी देखील त्या युवकांनी फेकून दिली. याप्रकरणी अँड सुनील बोराडे यांनी उपनगर पोलीस ठाण्यात हल्ला करणाऱ्या अज्ञात युवकांविरोधात अदखलपात्र गुन्हा केला आहे. उपनगर पोलिसांनी घटनास्थळी जाऊन त्या भागातील सीसीटीव्ही फुटेज तपासणी सुरू केली आहे .नाशिकरोड परिसरात वाढत चाललेली गुंडगिरी ही नागरिकांसाठी डोखेदुखी ठरू पहात आहे. ही गुंडगिरी पोलिसांनी वेळीच ठेचून काढण्याची मागणी जोर धरू लागली आहे.

![]()














