नाशकात लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर महाआघाडीला धक्का.

नाशिक :लोकसभेत माघारीला अवघे काही तास शिल्लक असताना मोठ्या घडामोडी बघावयास मिळत आहे. ठाकरे गटाच्या शिवसेनेचे विजय करंजकर यांना नाशिक लोकसभेत कामाला लागण्याच्या सूचना ठाकरे गटाच्या वरिष्ठ नेत्यांनी दिल्या होत्या. त्याप्रमाणे त्यांनी प्रचाराला देखील सुरवात केली होती . मात्र अचानक त्यांचा पत्ता कट होऊन सिन्नरचे आ राजाभाऊ वाजे यांना उमेदवारी दिल्याने विजय करंजकर संतप्त झाले होते यादरम्यान उद्धव ठाकरे यांनी त्यांना भेटीला बोलावल्याची देखील माहिती होती मात्र विजय करंजकर यांनी ठाकरे यांची भेट न घेता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, गिरीश महाजन यांना भेटणे पसंत केले यादरम्यान त्यांनी अपक्ष उमेदवारी अर्ज देखील भरला. आज झालेल्या मेळाव्यात त्यांच्यावर कसा अन्याय झाला याचा पाढा वाचत “मी लढणार आणि नडणार” असे देखील करंजकर म्हणाले होते .यादरम्यान हाती आलेल्या माहितीनुसार आज रात्री विजय करंजकर हे आपल्या हाती धनुष्य घेत असून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत शिंदे गटाच्या शिवसेनेत प्रवेश करणार आहेत. यावेळी त्यांच्यासोबत तालुका प्रमुख, जिल्हा परिषद सदस्य, प्रवेश घेणार आहेत यावेळी पालकमंत्री दादा भुसे, भाऊसाहेब चौधरी, राजू लवटे, महानगरप्रमुख प्रवीण तिदमे उपस्थित राहणार आहेत.ऐन लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर नाशकात हा ठाकरे गटाला अर्थात महाआघाडीला मोठा धक्का मानला जात आहे.

![]()














