• Latest
  • Trending

नाशिकमध्ये ठाकरे गटाच्या शिवसेनेची डोकेदुखी वाढण्याची शक्यता ?

April 30, 2024
शुद्ध हवा विसरा… नाशिकची  हवा ‘अस्वस्थ’ करणारी

शुद्ध हवा विसरा… नाशिकची हवा ‘अस्वस्थ’ करणारी

October 16, 2026
त्र्यंबकेश्वरमध्ये 31 फूट सिंहस्थ ध्वजस्तंभाचे पूजन

त्र्यंबकेश्वरमध्ये 31 फूट सिंहस्थ ध्वजस्तंभाचे पूजन

October 15, 2026
पक्षासाठी लढणाऱ्या कार्यकर्त्यांना कधी मिळणार पदे ?

पक्षासाठी लढणाऱ्या कार्यकर्त्यांना कधी मिळणार पदे ?

October 15, 2026
नासिक मध्ये दोन कोटींचा रुग्ण घोटाळा तीन हॉस्पिटल्स वर गुन्हा दाखल

नासिक मध्ये दोन कोटींचा रुग्ण घोटाळा तीन हॉस्पिटल्स वर गुन्हा दाखल

October 14, 2026
जिनिव्हाच्या जागतिक मंचावर घुमला नाशिकच्या महापौरांचा आवाज

जिनिव्हाच्या जागतिक मंचावर घुमला नाशिकच्या महापौरांचा आवाज

October 13, 2026
नाशकात शिंदे गटाच्या नेत्यावर कोयत्याने हल्ला

कायद्याच्या बालेकिल्ल्यात तरुणांवर कोयत्याने आणि पेवर ब्लॉक ने हल्ला

October 13, 2026
नाशिकच्या कार्यक्रमात मुख्यमंत्री पोलिसांवर नाराज…

नाशिकच्या कार्यक्रमात मुख्यमंत्री पोलिसांवर नाराज…

October 11, 2026
नाशिक आणि त्र्यंबकेश्वरचा  कायापालट होणार-मुख्यमंत्री

नाशिक आणि त्र्यंबकेश्वरचा कायापालट होणार-मुख्यमंत्री

October 11, 2026
भविष्यात गणेश आणि नवरात्र उत्सव मंडळांची संख्या कमी होण्याची शक्यता ?

भविष्यात गणेश आणि नवरात्र उत्सव मंडळांची संख्या कमी होण्याची शक्यता ?

October 11, 2026
नाशिकच्या खड्ड्यांनी घेतला तेरावा बळी; नातेवाईकांचा आरोप

नाशिकच्या खड्ड्यांनी घेतला तेरावा बळी; नातेवाईकांचा आरोप

October 9, 2026
‘नटसम्राट’ची एक्झिट! ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांचे निधन

‘नटसम्राट’ची एक्झिट! ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांचे निधन

October 8, 2026
महापालिकेत “उद्यान” घोटाळा

महापालिकेत “उद्यान” घोटाळा

October 7, 2026
News Black & White
Sunday, October 18, 2026
  • Home
  • महाराष्ट्र
  • देशविदेश
  • क्रीडा
  • राजकीय
  • विविध
  • शेअर बाजार
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • संपादकीय
No Result
View All Result
News Black & White
No Result
View All Result

नाशिकमध्ये ठाकरे गटाच्या शिवसेनेची डोकेदुखी वाढण्याची शक्यता ?

YOU MAY ALSO LIKE

अखेर नगरसेवक प्रविण तिदमे यांची नाराजी दूर

नासिकमध्ये महिला नेत्याने उमेदवारी अर्ज मागे घेतला आणि…….

नाराज असलेले विजय करंजकर बंडखोरीच्या तयारीत

नाशिक: लोकसभेत महायुतीचा तिढा अजूनही संपलेला नसताना स्वामी शांतिगिरी महाराज यांनी शिवसेनेच्या नावाने उमेदवारी अर्ज भरला यामुळे गोंधळात अजून भर पडली. तर दुसरीकडे महाआघाडीच्या ठाकरे गटाकडून नाशिक लोकसभेसाठी राजाभाऊ वाजे यांची उमेदवारी घोषित करण्यात आली मात्र आघाडीत सर्वच काही अलबेल नसल्याचे चित्र उभे टाकले आहे. नासिक लोकसभा मतदार संघातील ठाकरे गटाचे शिलेदार व सध्या नाराज असलेले विजय करंजकर यांनी उमेदवारी अर्ज नेल्याने ठाकरे ठाकरे गटाची नाशिक लोकसभा मतदारसंघात डोकेदुखी वाढण्याची दाट शक्यता आहे. राज्यपाल नियुक्त विधान परिषद सदस्यासाठी विजय करंजकर यांना संधी देण्यात आली होती. मात्र तत्कालीन राज्यपालांनी नियुक्तीच केली नसल्याने त्यांची ही संधी हुकली त्यामुळे त्यांच्याविषयी पक्षात आणि नागरिकांमध्ये सहानुभूती निर्माण झाली. या सहानभूतीचा फायदा घेण्यासाठी ठाकरे गटाच्या वतीने विजय करंजकर यांना नासिक लोकसभा मतदारसंघातून उमेदवारी देण्याची तयारी झाली होती. त्याचबरोबर विजय करंजकर यांना वरिष्ठ पातळीवरून तयारीला लागण्याच्या सूचना देखील देण्यात आल्या होत्या त्यानुसार विजय करंजकर यांनी मतदारसंघ पिंजून काढण्यास सुरुवात केली होती. नासिक मधील ठाकरे गटाच्या शिवसैनिकांना देखील विजय करंजकर यांची उमेदवारी फायनल वाटल्याने त्यांनी देखील प्रचाराला सुरुवात केली होती. मात्र अचानक पणे विजय करंजकर यांचा पत्ता कट करत सिन्नर चे माजी आमदार राजाभाऊ वाजे यांना ठाकरे गटाकडून उमेदवारी देण्यात आली. त्यामुळे नाराज असलेल्या विजय करंजकर यांचा संताप अनावर झाला. व त्यांनी बंडखोरीची तयारी केली होती. पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याशी चर्चा करून निर्णय घेऊ असे त्यांनी सांगितले देखील होते. विशेष म्हणजे उद्धव ठाकरे यांनी तीन वेळेस विजय करंजकर यांना भेटण्यासाठी बोलावले होते मात्र करंजकर हे गेले नाहीत. त्याऐवजी ते महायुतीच्या संपर्कात आले. यादरम्यान त्यांनी शिर्डी विमानतळावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट देखील घेतल्याची चर्चा होती. त्याचबरोबर करंजकर यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची देखील भेट घेतली होती. मात्र महायुतीतच अजून उमेदवार ठरत नसल्याने अखेर काल त्यांनी उमेदवारी अर्ज नेला असून तो भरण्याची शक्यता आहे. यामुळे बंडखोरी झाल्यास याचा त्रास महाआघाडीतील ठाकरे गटाला होण्याची शक्यता निर्माण आहे. मात्र विजय करंजकर हे पक्षाबरोबर एकनिष्ठ राहतात अथवा बंडखोरी करतात अथवा ठाकरे गट बंडखोरी थांबविण्यात यशस्वी होतील .याकडे पक्षाचे आणि नाशिककरांचे लक्ष लागून आहे.

Loading

Previous Post

नाशिक लोकसभा मतदारसंघात ट्विस्ट…स्वामी शांतिगिरी महाराजांनी शिवसेनेच्या नावाने भरला उमेदवारी अर्ज

Next Post

नाशिकमध्ये महायुतीच्या गोटात हालचालींना वेग….

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Search

No Result
View All Result
  • About
  • advertise
  • Privacy & Policy
  • Contact Us

© 2024 Black & White

No Result
View All Result
  • Home
  • महाराष्ट्र
  • देशविदेश
  • क्रीडा
  • राजकीय
  • विविध
  • शेअर बाजार
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • संपादकीय

© 2024 Black & White