संकटमोचक गिरीश महाजन नाशकात तर भुजबळांच्या भेटीला भाजपा पदाधिकारी भुजबळ फार्म वर

नाशिक :अपक्ष असलेल्या स्वामी शांतिगिरी महाराज यांनी नाशिक लोकसभेसाठी अर्ज दाखल करताना अर्जावर शिवसेनेचे नाव टाकले मात्र नाशिक शहरातील शिंदे गटाच्या पदाधिकाऱ्यांनी आपल्या कानावर हात ठेवत आपल्याला या घटनेविषयी काही कल्पना नसल्याचे सांगितल्याने गोधळात अजून भर पडली. त्यानंतर मात्र आज नाशिक शहरात महायुतीतील घडामोडींना मोठ्या प्रमाणात वेग आला. संकट मोचक समजले जाणारे भाजपाचे गिरीश महाजन यांनी आज नाशिक शहरात धाव घेत गुप्त बैठकां घेण्यास सुरुवात केली.मुख्य म्हणजे आज भाजपा कार्यालयात शिंदे गटाचे इच्छुक उमेदवार अजय बोरस्ते हे गिरीश महाजन यांना भेटण्यासाठी पोहोचले. यादरम्यान काही भाजपा पदाधिकारी देखील उपस्थित असल्याचे समजते. यावेळी बैठक झाली असून या बैठकीत नेमके कोणते मुद्दे चर्चेत आले हे अजून समजू शकले नाही. तर दुसरीकडे आज भुजबळ फार्मवर मोठ्या प्रमाणात हालचाली दिसून आल्या अजित पवार गटाचे राष्ट्रवादीचे नेते मंत्री छगन भुजबळ यांना भेटण्यासाठी भाजपाचे निवडक पदाधिकारी भुजबळ फार्मवर पोहोचले. यावेळी केंद्रीय मंत्री भारतीय पवार, बाळासाहेब सानप, विजय साने, प्रशांत जाधव ,आधी पदाधिकारी उपस्थित होते मुख्य म्हणजे नाशिक लोकसभा मतदारसंघात उमेदवार जाहीर होत नसल्याने भुजबळ यांनी खंत व्यक्त करत माघार घेतली होती आणि सर्व घडामोडींपासून काहीसे अंतर राखले होते. त्यांची नाराजी दूर करण्यासाठी भाजपाचे पदाधिकारी पोहोचल्याचे समजते. त्याचबरोबर दिंडोरी मतदार संघ हा येवल्यात येत असल्याने येवल्यात छगन भुजबळ यांना मानणारा मोठा वर्ग असल्याने त्यांनी दिंडोरी मतदार संघात लक्ष घालावे. यासाठी केंद्रीय मंत्री भारती पवार यांनी विनंती केल्याचे समजते. त्याचबरोबर समता परिषद च्या उमेदवारांनी अर्ज नेल्याने ही भेटीची ही एक किनार असू शकते. यामुळेच भाजपा नेते भुजबळ फार्म वर पोहचले असावेत असा अंदाज राजकीय वर्तुळात चर्चिला जात आहे. आजचा संपूर्ण दिवस हा महायुती मध्ये हालचालींचा दिसून आला.

![]()












