उमेदवारीसाठी उरले फक्त दोन दिवस

आज 1 मे रोजी महाराष्ट्र दिनाची सुट्टी असल्याने अर्ज प्रक्रिया बंद आहे. त्यामुळे गुरुवार व शुक्रवार असे दोनच दिवस अर्ज दाखल करण्यासाठी मिळणार असल्याने या दोन दिवसात अर्जांची संख्या वाढेल त्या दृष्टीने प्रशासनाने तयारी सुरू केली आहे. काल नाशिक मतदारसंघासाठी तीन अर्ज दाखल झाले. यामध्ये अंजिनेरी येथील सिद्धेस्वरानंद गुरू स्वामी सोमेश्वरानंद सरस्वती यांनी आपल्या समर्थकांसह रॅली काढली .शांतिगिरी महाराज यांच्याप्रमाणेच तेही बैलगाडीने जिल्हाधिकार्यालयात अर्ज देण्यासाठी आले होते. तर निर्भय महाराष्ट्र पक्षाचे जितेंद्र नरेश भावे यांनी देखील अर्ज दाखल केला. सर्वसामान्य नागरिकांच्या हाकेला भावे धावून जातात अशी त्यांची नाशिक जिल्ह्यात ओळख आहे. त्याचबरोबर कमलाकर बाळासाहेब गायकवाड, दलित शोषित पिछडा वर्ग अधिकारी दल च्या वतीने अर्ज केला अशी एकूण तीन अर्ज दाखल झालीत. यामध्ये प्रमुख उमेदवार व त्यांचे समर्थक नसल्याने वर्दळ नव्हती तर दिंडोरी मतदारसंघासाठी एकही उमेदवारी अर्ज दाखल झाला नाही मात्र गुरुवार, शुक्रवारी मोठ्या प्रमाणात गर्दी होण्याची शक्यता असून आज नाशिक लोकसभा मतदारसंघासाठी महायुतीच्या उमेदवाराची घोषणा अवघ्या काही तासात होऊ शकते भाजपा नेते गिरीश महाजन यांनी शांतिगिरी महाराज यांची भेट घेऊन महायुतीला समर्थन देण्याचे आव्हान केल्याचे समजते. त्यामुळे ही जागा शिंदे गटाच्या शिवसेनेला सुटल्याने सध्या तरी शिंदे गटाकडे हेमंत गोडसे अथवा त्यांची सून भक्ती गोडसे हेच पर्याय असल्याने उमेदवारी हेमंत गोडसे अथवा भक्ती गोडसेना मिळते हे पाहणे महत्वाचे ठरेल. त्याचबरोबर कमी वेळ असल्याने गोडसे यांनी आधीच प्रचार सुरू ठेवल्याने हे महायुतीच्या पथ्यावर पडू शकते .तर दुसरीकडे दिंडोरी लोकसभेच्या भारती पवार या देखील उद्या उमेदवारी अर्ज दाखल करू शकतात. मात्र हरिश्चंद्र चव्हाण हे बंडखोरीच्या तयारीत असल्याने भारती पवार यांना अडचणीचे ठरू शकते, चव्हाण म्हणतात शेतकऱ्यांसाठी अभी नही तो कभी नही म्हणत उमेदवारीसाठी ठाम असल्याचे समजते त्यामुळे पक्ष त्यांची बंडखोरी कसे थांबवतात याकडे कार्यकर्त्यांचे लक्ष लागून आहे.

![]()












