नाशिकचा सस्पेन्स संपला महायुतीकडून हेमंत गोडसे यांना अखेर उमेदवारी जाहीर

नाशिक : अखेर न्यूज ब्लँक अँड व्हाइटची बातमी ठरली खरी (शिंदे गटाला हेमंत गोडसे हेच पर्याय) महायुतीतील शिंदे गटाच्या शिवसेनेकडून हेमंत गोडसे यांना नाशिक मधून उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. त्यामुळे नाशिकचा सस्पेन्स अखेर संपला. गेल्या अनेक दिवसापासून नाशिकच्या जागेवरून महायुतीमध्ये घोळ सुरू होता अखेर हेमंत गोडसे यांच्या नावावर शिक्का शिक्कामोर्तब झाला असून, शिवसेनेच्या शिंदे गटाने अधिकृतपणे घोषणा केली आहे. स्वामी शांतिगिरी महाराज, विजय करंजकर यांनी शेवटपर्यंत नाशिकच्या जागेसाठी जोर लावला मात्र हेमंत गोडसे यांनी शेवटपर्यंत नाशिक लोकसभेच्या जागेसाठी प्रयत्न सुरू ठेवले होते. अखेर त्यांच्या मेहनतीला मोठे यश आल्याचे दिसत असून कमी कालावधीत त्यांना नियोजन करावे लागणार असून नाशिक लोकसभेत आता खरी लढत ठाकरेंच्या शिवसेनेत व शिंदेंच्या शिवसेनेत असणार आहे त्यामुळे ठाकरे गटाकडून राजाभाऊ वाजे तर शिंदे गटाकडून हेमंत गोडसे यांची ही लढत रंगतदार ठरणार आहे.


![]()











