कोल्हापूर,नागपूरसह सात जागांवर आबडेकरांच्या “वंचीत” चा कॉग्रेसला पाठिंबा

मुंबई : अकोला लोकसभा मतदारसंघातून काँग्रेसने डॉ अभय पाटील यांची उमेदवारी जाहीर केली असून डॉ पाटील यांची उमेदवारी जाहीर झाल्याने काँग्रेस, वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार प्रकाश आंबेडकर यांना पाठिंबा देणार असल्याच्या चर्चांना पूर्णविराम मिळाला आहे . महाविकास आघाडी बरोबर आंबेडकरांच्या मागील दीड महिन्यांपासून जागा वाटपा बाबत वाटाघाटी सुरू होत्या. महाविकास आघाडीने आधी चार आणि नंतर सहा जागांचा प्रस्ताव आंबेडकरांसमोर ठेवला होता. मात्र आपल्याला किती जागा हव्यात त्यावर आंबेडकरांनी भूमिका स्पष्ट न करता महाविकास आघाडीच्या नेत्यांवर आरोप करत थेट आपले उमेदवार जाहीर केले. आधी सात आणि नंतर स्वतःची अकोल्यातून उमेदवारी जाहीर करत 20 उमेदवार आत्तापर्यंत वंचित ने जाहीर केले आहेत. हे उमेदवार जाहीर करताना कोल्हापूर नागपूर बरोबर सात जागांवर आपण काँग्रेसला पाठिंबा देत असल्याचेही आंबेडकरांनी जाहीर केले. आंबेडकरांनी सात जागांवर पाठिंबा दिल्यानंतर प्रदेश काँग्रेसनेही आंबेडकरांना अकोल्यात पाठिंबा देण्याबाबतचा प्रस्ताव दिल्लीला पाठवला होता मात्र दिल्लीहून सोमवारी थेट डॉक्टर अभय पाटील यांची उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे.
![]()












