
नाशिक :शहरातील उपनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील विहीत गाव येथे कार्यरत लाचखोर तलाठी आरोपी सतीश नवले (राहणार उपनगर) यांच्यासह त्यांचा खाजगी मदतनीस दत्तात्रय ताजनपुरे (राहणार चेहडी) या दोघांना प्रतिबंधक विभागाच्या पथकाने रंगेहाथ जाळ्यात पकडले असून तक्रादाराकडून तडजोड अंती 3 हजार रुपयांची लाच स्वीकारताना अटक करण्यात आली आहे. लाच-लुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार करणाऱ्या महिलेच्या पतीच्या नावे असलेल्या जमिनीच्या क्षेत्रामध्ये तुकडेबंदी व तुकडे जोड कायद्याचा भंग होत होता. त्यामुळे नाशिकचे तहसीलदार यांनी त्यांच्या मालकीचे क्षेत्र 0.01 चे एकूण मूल्यांकन रक्कम रुपये एक लाखाचे 25% प्रमाणे 25000 रुपयांचा भरणा केला. त्यानंतर तहसीलदार यांनी नवले यांना इतर अधिकारातील तुकडा नियमाधिकरण अधिमुल्य हा शहरात तक्रारदार यांच्या पतीचे नाव असलेल्या क्षेत्रापुरता कमी करण्यात यावा असे आदेश दिले होते. उपनगर पोलीस ठाण्यात उशिरापर्यंत गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते
![]()











