गुन्हेगारी थांबता थांबेना !

नाशिक : शहरातील वाढत्या गुन्हेगारीवर सर्वच बाजूने टीका होत असताना पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांनी पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्या करत गुन्हेगारीवर नियंत्रण मिळविण्याचा प्रयत्न केला असता पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्यानां अवघे काही तास झाले असतानाच शनिवारी मध्यरात्री सातपूर परिसरातील आयटीआय सिग्नल जवळ एका कॅफेत गोळीबार झाल्याची घटना उघडकीस आल्याने खळबळ उडाली आहे. मिळालेल्या माहितीनुसार सातपूर परिसरातील आयटीआय सिग्नल येथील नाईस कॅफे येथे रात्रीच्या सुमारास तिवारी नामक व्यक्तीवर हल्ला करण्यात आला.तिवारी याला मुंबई नाका येथील हॉस्पिटल येथे उपचारासाठी दाखल केले असून तिवारी याच्या पायाला गोळी लागल्याची प्राथमिक माहिती मिळत आहे. हा हल्ला नेमका कोणी केला कुठल्या कारणावरून केला याचा शोध पोलिस घेत आहेत.यासाठी पथके रवाना करण्यात आल्याची माहिती मिळत आहे.

![]()












