• Latest
  • Trending
नाशकात स्फोटकांचा साठा आणि पोलिसांनी केला उलगडा

नाशकात स्फोटकांचा साठा आणि पोलिसांनी केला उलगडा

September 2, 2025
शुद्ध हवा विसरा… नाशिकची  हवा ‘अस्वस्थ’ करणारी

शुद्ध हवा विसरा… नाशिकची हवा ‘अस्वस्थ’ करणारी

October 16, 2026
त्र्यंबकेश्वरमध्ये 31 फूट सिंहस्थ ध्वजस्तंभाचे पूजन

त्र्यंबकेश्वरमध्ये 31 फूट सिंहस्थ ध्वजस्तंभाचे पूजन

October 15, 2026
पक्षासाठी लढणाऱ्या कार्यकर्त्यांना कधी मिळणार पदे ?

पक्षासाठी लढणाऱ्या कार्यकर्त्यांना कधी मिळणार पदे ?

October 15, 2026
नासिक मध्ये दोन कोटींचा रुग्ण घोटाळा तीन हॉस्पिटल्स वर गुन्हा दाखल

नासिक मध्ये दोन कोटींचा रुग्ण घोटाळा तीन हॉस्पिटल्स वर गुन्हा दाखल

October 14, 2026
जिनिव्हाच्या जागतिक मंचावर घुमला नाशिकच्या महापौरांचा आवाज

जिनिव्हाच्या जागतिक मंचावर घुमला नाशिकच्या महापौरांचा आवाज

October 13, 2026
नाशकात शिंदे गटाच्या नेत्यावर कोयत्याने हल्ला

कायद्याच्या बालेकिल्ल्यात तरुणांवर कोयत्याने आणि पेवर ब्लॉक ने हल्ला

October 13, 2026
नाशिकच्या कार्यक्रमात मुख्यमंत्री पोलिसांवर नाराज…

नाशिकच्या कार्यक्रमात मुख्यमंत्री पोलिसांवर नाराज…

October 11, 2026
नाशिक आणि त्र्यंबकेश्वरचा  कायापालट होणार-मुख्यमंत्री

नाशिक आणि त्र्यंबकेश्वरचा कायापालट होणार-मुख्यमंत्री

October 11, 2026
भविष्यात गणेश आणि नवरात्र उत्सव मंडळांची संख्या कमी होण्याची शक्यता ?

भविष्यात गणेश आणि नवरात्र उत्सव मंडळांची संख्या कमी होण्याची शक्यता ?

October 11, 2026
नाशिकच्या खड्ड्यांनी घेतला तेरावा बळी; नातेवाईकांचा आरोप

नाशिकच्या खड्ड्यांनी घेतला तेरावा बळी; नातेवाईकांचा आरोप

October 9, 2026
‘नटसम्राट’ची एक्झिट! ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांचे निधन

‘नटसम्राट’ची एक्झिट! ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांचे निधन

October 8, 2026
महापालिकेत “उद्यान” घोटाळा

महापालिकेत “उद्यान” घोटाळा

October 7, 2026
News Black & White
Sunday, October 18, 2026
  • Home
  • महाराष्ट्र
  • देशविदेश
  • क्रीडा
  • राजकीय
  • विविध
  • शेअर बाजार
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • संपादकीय
No Result
View All Result
News Black & White
No Result
View All Result

नाशकात स्फोटकांचा साठा आणि पोलिसांनी केला उलगडा

YOU MAY ALSO LIKE

नाशिकमध्ये मित्राने मोबाईलचा रिमोट ॲक्सेस घेतला आणि विवाहितेने जीवन संपवलं

नाशिकचा ‘तो’ नेता तुरुंगातून लढविणार निवडणूक

कंपनीच्या प्रतिनिधीसह भंगार व्यापाऱ्यास अटक

नाशिक : शहरातील कर्मवीर दादासाहेब गायकवाड सभागृहाच्या पाठीमागे असलेल्या नंदिनी नदी पात्रात काही दिवसांपूर्वी दहा ते बारा गोण्यामध्ये जिलेटीनसदृश स्फोटकांचा मोठा साठा आढळून आल्याने शहरात खळबळ उडाली होती. मात्र मुंबई नाका पोलिसांनी काही तासातच या घटनेचा उलगडा करत संबंधितांना अटक करण्यात यश मिळविले. मिळालेल्या माहितीनुसार “चला जाणूया नंदिनी नदीला” या अभियानांतर्गत नदीकाठलगत मनपाच्या उद्यान विभागामार्फत वृक्षलागवड करण्यात आली. या दरम्यान नदीकाठची पाहणी करताना त्यांना जिलेटीनसदृश स्फोटकांचा मोठा साठा नजरेस पडला त्यानंतर घटनेची माहिती पोलिसांना कळविण्यात आली, मुंबई नाका पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत तत्काळ बॉम्बशोधक-नाशक पथकाला पाचारण केले. त्यानंतर पोलिसांनी गायकवाड सभागृहाच्या पाठीमागील सीसीटीव्ही कॅमेऱ्याचे फुटेज गुन्हे शोध पथकाने तपासण्यास सुरवात केली. या फुटेजमध्ये दिसणाऱ्या संशयास्पद टेम्पोचा मालक यास ताब्यात घेतल्यानंतर केलेल्या चौकशीत महत्वाची माहिती पुढे आली. समृद्धी महामार्ग विकसित करताना अडथळा करणारे दगड, डोंगर फोडण्याचे कंत्राट ठाणे जिल्ह्यातील कसारा येथील एका कंपनीने घेतले होते. त्यासाठी कंपनीने जिलेटिनचा मोठ्या प्रमाणात वापर केला होता. दरम्यान 27 सप्टेंबर रोजी एक जुने मालवाहू कंटेनरची लोखंडी बॉडी कंपनीचे प्रतिनिधी संशयित अशोक कर्डक यांनी भद्रकाली परिसरातील भंगार व्यवसायिक जाकीर हनिफ अत्तार यांना विक्री केली होती. अत्तार यांनी ही बॉडी जेव्हा कामगारांनमार्फत तोडण्याचे काम सुरू केले होते. त्यामध्ये हा साठा मिळून आला होता. त्यांना या स्फोटकांच्या साठा बाबत माहिती नव्हती. त्यांनी तो कंपनीतील काही-तरी कचरा समजून सर्व गोण्या कामगार संशयित दबीर अन्सारी यास विल्हेवाट लावण्यास सांगितले. त्याने टेम्पोचालक रिहान शेख यास भाडे देऊन या सर्व गोण्या त्यामध्ये वाहतूक करत असलेल्या दादासाहेब गायकवाड सभागृहाच्या पाठीमागे नदीपात्रात रात्री आणून टाकल्या होत्या.मुदतबाह्या झालेल्या या स्फोटकाच्या साठ्याची निष्काळजीपणे विल्हेवाट लावल्याप्रकरणी मुंबई नाका पोलिसांनी संबंधित कंपनीच्या अधिकृत प्रतिनिधीसह भंगार व्यावसायिक आणि एका टेम्पोचालकाला अटक केली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार नंदिनी नदीपात्रात मिळून आलेला जिलेटीनसदृश स्फोटकांचा साठा हा सगळा मुदतबाह्या असून दहशतवादी कृत्य किंवा कुठलाही घातपात करण्याचा यामागे तसा काही उद्देश तपासातून निष्पन्न झालेलं नाही.

Loading

Previous Post

नाशिकमधील भाजपच्या माजी नगरसेवकाच्या अडचणीत वाढ

Next Post

नाशकात ठाकरेंच्या सेना- मनसेचा जनआक्रोश

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Search

No Result
View All Result
  • About
  • advertise
  • Privacy & Policy
  • Contact Us

© 2024 Black & White

No Result
View All Result
  • Home
  • महाराष्ट्र
  • देशविदेश
  • क्रीडा
  • राजकीय
  • विविध
  • शेअर बाजार
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • संपादकीय

© 2024 Black & White