• Latest
  • Trending
नाशिकमधील भाजपच्या माजी नगरसेवकाच्या अडचणीत वाढ

नाशिकमधील भाजपच्या माजी नगरसेवकाच्या अडचणीत वाढ

August 29, 2025
शुद्ध हवा विसरा… नाशिकची  हवा ‘अस्वस्थ’ करणारी

शुद्ध हवा विसरा… नाशिकची हवा ‘अस्वस्थ’ करणारी

October 16, 2026
त्र्यंबकेश्वरमध्ये 31 फूट सिंहस्थ ध्वजस्तंभाचे पूजन

त्र्यंबकेश्वरमध्ये 31 फूट सिंहस्थ ध्वजस्तंभाचे पूजन

October 15, 2026
पक्षासाठी लढणाऱ्या कार्यकर्त्यांना कधी मिळणार पदे ?

पक्षासाठी लढणाऱ्या कार्यकर्त्यांना कधी मिळणार पदे ?

October 15, 2026
नासिक मध्ये दोन कोटींचा रुग्ण घोटाळा तीन हॉस्पिटल्स वर गुन्हा दाखल

नासिक मध्ये दोन कोटींचा रुग्ण घोटाळा तीन हॉस्पिटल्स वर गुन्हा दाखल

October 14, 2026
जिनिव्हाच्या जागतिक मंचावर घुमला नाशिकच्या महापौरांचा आवाज

जिनिव्हाच्या जागतिक मंचावर घुमला नाशिकच्या महापौरांचा आवाज

October 13, 2026
नाशकात शिंदे गटाच्या नेत्यावर कोयत्याने हल्ला

कायद्याच्या बालेकिल्ल्यात तरुणांवर कोयत्याने आणि पेवर ब्लॉक ने हल्ला

October 13, 2026
नाशिकच्या कार्यक्रमात मुख्यमंत्री पोलिसांवर नाराज…

नाशिकच्या कार्यक्रमात मुख्यमंत्री पोलिसांवर नाराज…

October 11, 2026
नाशिक आणि त्र्यंबकेश्वरचा  कायापालट होणार-मुख्यमंत्री

नाशिक आणि त्र्यंबकेश्वरचा कायापालट होणार-मुख्यमंत्री

October 11, 2026
भविष्यात गणेश आणि नवरात्र उत्सव मंडळांची संख्या कमी होण्याची शक्यता ?

भविष्यात गणेश आणि नवरात्र उत्सव मंडळांची संख्या कमी होण्याची शक्यता ?

October 11, 2026
नाशिकच्या खड्ड्यांनी घेतला तेरावा बळी; नातेवाईकांचा आरोप

नाशिकच्या खड्ड्यांनी घेतला तेरावा बळी; नातेवाईकांचा आरोप

October 9, 2026
‘नटसम्राट’ची एक्झिट! ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांचे निधन

‘नटसम्राट’ची एक्झिट! ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांचे निधन

October 8, 2026
महापालिकेत “उद्यान” घोटाळा

महापालिकेत “उद्यान” घोटाळा

October 7, 2026
News Black & White
Sunday, October 18, 2026
  • Home
  • महाराष्ट्र
  • देशविदेश
  • क्रीडा
  • राजकीय
  • विविध
  • शेअर बाजार
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • संपादकीय
No Result
View All Result
News Black & White
No Result
View All Result

नाशिकमधील भाजपच्या माजी नगरसेवकाच्या अडचणीत वाढ

YOU MAY ALSO LIKE

नाशिकमध्ये मित्राने मोबाईलचा रिमोट ॲक्सेस घेतला आणि विवाहितेने जीवन संपवलं

नाशिकचा ‘तो’ नेता तुरुंगातून लढविणार निवडणूक

 ‘त्या’ युवकाचा उपचारादरम्यान मृत्यू

नाशिक : पंचवटीतील नांदूर नाका परिसरात किरकोळ वादातून टोळक्याने केलेल्या बेदम मारहाणीत गंभीर जखमी झालेल्या राहुल धोत्रे या युवकाचा आज  रुग्णालयात मृत्यू झाला.यामध्ये भाजपचे माजी नगरसेवक उद्धव निमसे हे या प्रकरणातील संशयित असल्याने मृत युवकाचे कुटुंंबिय, नातेवाईकांसह स्थानिकांनी पोलीस आयुक्तालयात धाव घेत माजी नगरसेवक उद्धव निमसे यांना अटक करण्याची मागणी केली. मिळालेल्या माहितीनुसार 22 ऑगस्ट रोजी निमसे यांच्या सहकाऱ्यांबरोबर सनी धोत्रे या तरुणाचे किरकोळ वाद झाले होते. त्यानंतर काही वेळातच भाजपचे नगरसेवक निमसे यांनी तक्रारदार आकाश धोत्रेला दमदाटी करत जमावाला चिथावणी दिल्याने टोळक्याने लाकडी दांडके, हत्यारांनी अजय कुसाळकर (२७) आणि तक्रारदाराचा भाऊ राहुल धोत्रे यांच्यावर प्राणघातक हल्ला केला. दोघांना बेदम मारहाण करण्यात आली. यावेळी  चॉपरचा वापर करण्यात आला. यात राहुल धोत्रे आणि अजय कुसाळकर हे दोघे गंभीर जखमी झाले. त्यांना खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. या चिथावणीचे व्हिडीओ सोशल मीडियावर मोठ्याप्रमाणात व्हायरल झाले होते. याप्रकरणी भाजपचे माजी नगरसेवक निमसे यांच्याबरोबर अन्य संशयितांविरोधात आडगाव पोलिसात  गुन्हा दाखल करण्यात आला होता. यावेळी पाच जणांना पोलिसांनी अटक केली होती. मात्र आज सकाळी जखमी राहुल धोत्रे या युवकाचा रुग्णालयात मृत्यू झाला.  राहुल यांच्या मृत्युनंतर कुटुंबियांनी नातेवाईक व स्थानिक नागरिकांसह पोलीस आयुक्तालयात धाव घेतली. यावेळी वंचित बहुजन आघाडीचे पदाधिकारी  उपस्थित होते. धोत्रे कुटुंबियांनी पोलीस आयुक्तांची भेट घेत निमसे यांना तत्काळ अटक करून कठोर कारवाईची मागणी यावेळी करण्यात आली. याप्रकरणात फरार संशयितांना अटक करण्यासाठी पोलिसांची दोन पथके रवाना करण्यात आल्याची माहिती मिळते आहे. ठाकरे गटाकडून देण्यात आला होता इशारा…….  दरम्यान, काही दिवसांपूर्वी शिवसेना ठाकरे गट व पीडित कुटुंबीयांनी पोलीस आयुक्तांची भेट घेऊन त्यांना निवेदन सादर केले होते. 22 ऑगस्ट रोजी आडगाव पोलीस स्टेशन हद्दीत दोन युवकांवर प्राणघातक हल्ला झाला. या हल्ल्याची सीसीटीव्ही फुटेजमध्ये संपूर्ण नोंद झाली असून भाजपाचे माजी नगरसेवक उद्धव निमसे हे या हल्ल्यात प्रत्यक्ष सहभागी झाले होते. त्यांनीच गुंडांना व मुलांना बरोबर घेऊन स्वतः त्या युवकांवर प्राणघातक हल्ला केलेला आहे. जखमी झालेल्या व्यक्तींनी दिलेल्या फिर्यादीमध्ये उद्धव निमसे यांचे नाव स्पष्टपणे नमूद असून देखील अद्याप त्यांच्यावर ठोस कारवाई झालेली नाही, यावरून प्रशासनावर राजकीय दबाव असल्याचे दिसून येते. माजी नगरसेवक उद्धव निमसे यांना तातडीने अटक करून त्यांच्यावर कठोर कारवाई करण्यात यावी. राजकीय दबावाला बळी न पडता ही चौकशी पूर्णपणे निष्पक्ष पद्धतीने करण्यात यावी. आमच्या मागण्या तत्काळ पूर्ण झाल्या नाही, तर तीव्र स्वरूपात आंदोलन करण्याचा इशारा ठाकरे गटाकडून देण्यात आला होता.

Loading

Previous Post

नाशिक महानगरपालिकेची प्रारूप प्रभाग रचना जाहीर

Next Post

नाशकात स्फोटकांचा साठा आणि पोलिसांनी केला उलगडा

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Search

No Result
View All Result
  • About
  • advertise
  • Privacy & Policy
  • Contact Us

© 2024 Black & White

No Result
View All Result
  • Home
  • महाराष्ट्र
  • देशविदेश
  • क्रीडा
  • राजकीय
  • विविध
  • शेअर बाजार
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • संपादकीय

© 2024 Black & White