
नाशिक : राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका घेण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. त्यानुसार महापालिका, नगरपालिका, जिल्हा परिषद व पंचायत समिती यांच्या निवडणूक टप्प्याटप्प्याने घेण्यात येणार आहेत. यासाठी नाशिक महापालिकेकडून प्रारूप प्रभाग रचना तयार करण्यात आली आहे. महानगरपालिकेची प्रभाग रचना जाहीर झाली असून सदर प्रभाग रचना २०११ च्या लोकसंख्येनुसार १२२ सदस्य संख्या कायम राहणार असून ४ सदस्यीय प्रभाग रचनेत कुठ्लाली बदल झाला नसून २०१७ च्या निवडणुकी प्रमाणे प्रभाग रचना जैसे थे राहणार आहे.
29 प्रभाग चार सदस्यीय तर 2 प्रभाग (15 आणि 19) हे तीन सदस्यीय असणार आहेत.
सदर प्रभाग रचनेवर ४ सप्टेंबर२०२५ पर्यंत हरकती व सूचना मांडता येणार आहे.

![]()















