• Latest
  • Trending
नाशकात शिंदेंच्या शिवसेनेत जोरदार राडा

नाशकात शिंदेंच्या शिवसेनेत जोरदार राडा

August 11, 2025
नाशिक धर्मांतर प्रकरणात निदा खानची धक्कादायक कबुली !

नाशिक धर्मांतर प्रकरणात निदा खानची धक्कादायक कबुली !

June 9, 2026
नाशिकमध्ये दराडे थेट गितेंच्या घरी

नाशिकमध्ये दराडे थेट गितेंच्या घरी

June 9, 2026
नासिक मध्ये भाजपच्या बंडखोराचा दराडेंना जाहीर पाठिंबा 

नासिक मध्ये भाजपच्या बंडखोराचा दराडेंना जाहीर पाठिंबा 

June 8, 2026
बंडखोर नेते प्रसाद हिरे थेट नाशिकच्या भाजप कार्यालयात

बंडखोर नेते प्रसाद हिरे थेट नाशिकच्या भाजप कार्यालयात

June 7, 2026
नाशिकमधील बंडखोरीचा वचपा जळगावमध्ये

नाशिकमधील बंडखोरीचा वचपा जळगावमध्ये

June 6, 2026
नाशिकमध्ये मंत्री महाजनांना नदी स्वच्छता मोहिमेदरम्यान सापडली पिस्तूल

नाशिकमध्ये मंत्री महाजनांना नदी स्वच्छता मोहिमेदरम्यान सापडली पिस्तूल

June 5, 2026
नाशकात संकटमोचकाचा चेंडू संकटमोचकाकडे !

नाशकात संकटमोचकाचा चेंडू संकटमोचकाकडे !

June 3, 2026
नाशकात भाजपचे गणेश गीते माघार घेणार की लढणार ?

नाशकात भाजपचे गणेश गीते माघार घेणार की लढणार ?

June 1, 2026
श्राद्ध विधीला हॉल देतो तुम्ही सिलेंडर घेऊन या !

श्राद्ध विधीला हॉल देतो तुम्ही सिलेंडर घेऊन या !

May 30, 2026
भोंदू बाबा ने जमीन हडपली अन् आश्रमात बनवले गुलाम

भोंदू बाबा ने जमीन हडपली अन् आश्रमात बनवले गुलाम

May 27, 2026
दारू पार्टी करणाऱ्या संशयित आरोपीबाबत  धक्कादायक खुलासे 

दारू पार्टी करणाऱ्या संशयित आरोपीबाबत धक्कादायक खुलासे 

May 25, 2026
नाशिकच्या IT कंपनीतील भयंकर घटना, लैंगिक अत्याचार ते तरुणाचे धर्मांतर

धर्मांतरण प्रकरणात 1500 पानांचं दोषारोपपत्र दाखल, धर्मांतरणाच्या संपूर्ण कटाचा पर्दाफाश

May 23, 2026
News Black & White
Thursday, June 11, 2026
  • Home
  • महाराष्ट्र
  • देशविदेश
  • क्रीडा
  • राजकीय
  • विविध
  • शेअर बाजार
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • संपादकीय
No Result
View All Result
News Black & White
No Result
View All Result

नाशकात शिंदेंच्या शिवसेनेत जोरदार राडा

YOU MAY ALSO LIKE

अखेर नगरसेवक प्रविण तिदमे यांची नाराजी दूर

नासिकमध्ये महिला नेत्याने उमेदवारी अर्ज मागे घेतला आणि…….

दोन गट भिडले प्रकरण शिवीगाळ,कॉलर धरण्यापर्यंत

नाशिक : महानगरपालिका निवडणुका डोळ्यासमोर ठेवत सर्वच राजकीय पक्ष तयारीला लागले असताना काही पक्षांमधील गटबाजी बाहेर येऊ लागली असून याचे रूपांतर राड्यात होऊ लागले आहे. काही दिवसांपूर्वी मनसे-ठाकरे गटाच्या शिवसेना बैठकीमध्ये ठाकरे गटाच्या शिवसेनेतील दोन नेत्यांमध्ये बाचाबाची झाल्याचे समोर आले होते. तर आज नाशिकमध्ये शिंदे गटाच्या शिवसेना पक्षाची उत्तर महाराष्ट्रातील पदाधिकाऱ्यांची बैठक पार पडली. या बैठकीत अहिल्यानगर जिल्ह्याचा आढावा घेणारी बैठक झाल्यानंतर मोठा राडा झाल्याचे बघायला मिळाला. या ठिकाणी दोन गट आमने-सामने आल्यानंतर बाचाबाची, शिवीगाळ करण्यात आली. तर हे प्रकरण थेट कॉलर पकडेपर्यंत गेल्याने परिस्थिती तणावपूर्ण झाली होती.शिवसेना शिंदे गटाच्या उत्तर महाराष्ट्रातील पदाधिकाऱ्यांच्या बैठकीचे आयोजन नाशिकमध्ये करण्यात आले होते. या बैठकीसाठी मंत्री उदय सामंत, दादा भुसे आणि खासदार राहुल शेवाळे हॉटेलमध्ये उपस्थित होते. या बैठकीदरम्यानच दोन गटात जोरदार राडा झाला. अहिल्यानगरचे शहरप्रमुख सचिन जाधव आणि बाबू शेठ यांच्यात राडा झाला असून शरद पवारांच्या राष्ट्रवादीचा पदाधिकारी बैठकीत शिरल्याचा आरोप करत दोन गट आपापसात भिडले. मुख्य म्हणजे महानगरपालिका आणि जिल्हा परिषद निवडणुकीच्या पूर्वतयारीसाठी शिंदे गटाच्या शिवसेनेने अहिल्यानगर, नंदुरबार, धुळे, जळगाव आणि नाशिक जिल्ह्यातील पदाधिकाऱ्यांच्या जिल्हानिहाय बैठकीचे आयोजन नाशिक येथील हॉटेल एक्स्प्रेस इन येथील सभागृहात केले होते. बैठकीस नेते, उपनेते, पालकमंत्री, आजी-माजी मंत्री, खासदार, आमदार, संपर्कप्रमुख, सहसंपर्कप्रमुख, जिल्हाप्रमुख, महानगरप्रमुख, तालुकाप्रमुख, शहरप्रमुख आणि पक्ष प्रवेश झालेल्या प्रमुख पदाधिकाऱ्यांना निमंत्रित करण्यात आले होते. मात्र कार्यकर्ते एकमेकांवर चालून गेले. त्यामुळे तणावाची परिस्थिती निर्माण झाली. पोलिसांसह सुरक्षा रक्षकांनी मध्यस्थी केली. या राड्याची चर्चा आज दिवसभर शहरात सुरू होती.

Loading

ShareTweet
Previous Post

नाशिकच्या इगतपुरी येथील रिसॉर्ट वर सीबीआयचे छापे !

Next Post

ठेकेदार करतो सफाई कर्मचाऱ्यांकडून खंडणी वसुली

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Search

No Result
View All Result

Recent News

नाशिक धर्मांतर प्रकरणात निदा खानची धक्कादायक कबुली !

नाशिक धर्मांतर प्रकरणात निदा खानची धक्कादायक कबुली !

June 9, 2026
नाशिकमध्ये दराडे थेट गितेंच्या घरी

नाशिकमध्ये दराडे थेट गितेंच्या घरी

June 9, 2026
नासिक मध्ये भाजपच्या बंडखोराचा दराडेंना जाहीर पाठिंबा 

नासिक मध्ये भाजपच्या बंडखोराचा दराडेंना जाहीर पाठिंबा 

June 8, 2026

Recent News

  • नाशिक धर्मांतर प्रकरणात निदा खानची धक्कादायक कबुली !
  • नाशिकमध्ये दराडे थेट गितेंच्या घरी
  • नासिक मध्ये भाजपच्या बंडखोराचा दराडेंना जाहीर पाठिंबा 
  • About
  • advertise
  • Privacy & Policy
  • Contact Us

© 2024 Black & White

No Result
View All Result
  • Home
  • महाराष्ट्र
  • देशविदेश
  • क्रीडा
  • राजकीय
  • विविध
  • शेअर बाजार
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • संपादकीय

© 2024 Black & White