• Latest
  • Trending
ठेकेदार करतो सफाई कर्मचाऱ्यांकडून खंडणी वसुली

ठेकेदार करतो सफाई कर्मचाऱ्यांकडून खंडणी वसुली

August 12, 2025
शुद्ध हवा विसरा… नाशिकची  हवा ‘अस्वस्थ’ करणारी

शुद्ध हवा विसरा… नाशिकची हवा ‘अस्वस्थ’ करणारी

October 16, 2026
त्र्यंबकेश्वरमध्ये 31 फूट सिंहस्थ ध्वजस्तंभाचे पूजन

त्र्यंबकेश्वरमध्ये 31 फूट सिंहस्थ ध्वजस्तंभाचे पूजन

October 15, 2026
पक्षासाठी लढणाऱ्या कार्यकर्त्यांना कधी मिळणार पदे ?

पक्षासाठी लढणाऱ्या कार्यकर्त्यांना कधी मिळणार पदे ?

October 15, 2026
नासिक मध्ये दोन कोटींचा रुग्ण घोटाळा तीन हॉस्पिटल्स वर गुन्हा दाखल

नासिक मध्ये दोन कोटींचा रुग्ण घोटाळा तीन हॉस्पिटल्स वर गुन्हा दाखल

October 14, 2026
जिनिव्हाच्या जागतिक मंचावर घुमला नाशिकच्या महापौरांचा आवाज

जिनिव्हाच्या जागतिक मंचावर घुमला नाशिकच्या महापौरांचा आवाज

October 13, 2026
नाशकात शिंदे गटाच्या नेत्यावर कोयत्याने हल्ला

कायद्याच्या बालेकिल्ल्यात तरुणांवर कोयत्याने आणि पेवर ब्लॉक ने हल्ला

October 13, 2026
नाशिकच्या कार्यक्रमात मुख्यमंत्री पोलिसांवर नाराज…

नाशिकच्या कार्यक्रमात मुख्यमंत्री पोलिसांवर नाराज…

October 11, 2026
नाशिक आणि त्र्यंबकेश्वरचा  कायापालट होणार-मुख्यमंत्री

नाशिक आणि त्र्यंबकेश्वरचा कायापालट होणार-मुख्यमंत्री

October 11, 2026
भविष्यात गणेश आणि नवरात्र उत्सव मंडळांची संख्या कमी होण्याची शक्यता ?

भविष्यात गणेश आणि नवरात्र उत्सव मंडळांची संख्या कमी होण्याची शक्यता ?

October 11, 2026
नाशिकच्या खड्ड्यांनी घेतला तेरावा बळी; नातेवाईकांचा आरोप

नाशिकच्या खड्ड्यांनी घेतला तेरावा बळी; नातेवाईकांचा आरोप

October 9, 2026
‘नटसम्राट’ची एक्झिट! ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांचे निधन

‘नटसम्राट’ची एक्झिट! ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांचे निधन

October 8, 2026
महापालिकेत “उद्यान” घोटाळा

महापालिकेत “उद्यान” घोटाळा

October 7, 2026
News Black & White
Sunday, October 18, 2026
  • Home
  • महाराष्ट्र
  • देशविदेश
  • क्रीडा
  • राजकीय
  • विविध
  • शेअर बाजार
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • संपादकीय
No Result
View All Result
News Black & White
No Result
View All Result

ठेकेदार करतो सफाई कर्मचाऱ्यांकडून खंडणी वसुली

YOU MAY ALSO LIKE

शुद्ध हवा विसरा… नाशिकची हवा ‘अस्वस्थ’ करणारी

त्र्यंबकेश्वरमध्ये 31 फूट सिंहस्थ ध्वजस्तंभाचे पूजन

आमदार देवयानी फरांदे यांनी अधिवेशनात मांडली होती लक्षवेधी

नाशिक : शहरात एक विचित्र प्रकार घडला असून चक्क स्वच्छता ठेकेदारच सफाई कर्मचाऱ्यांकडून खंडणी वसूल करत असल्याचा प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी आमदार देवयानी फरांदे यांनी सफाई कर्मचाऱ्यांबरोबर मनपा आयुक्त मनीषा खत्री यांची भेट घेत घडलेला प्रकार सांगितल्यानंतर त्या ठेकेदारावर गुन्हा दाखल करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. मिळालेल्या माहितीनुसार दोन ते तीन दिवसांपूर्वीच पगार मिळाल्यानंतर सफाई कर्मचाऱ्यांकडून प्रत्येकी पाच हजार तीनशे रुपये खंडणी वसूल केल्याचा आरोप या ठेकेदारावर करण्यात आला आहे. यानिमित्ताने महानगरपालिका हद्दीत काम करणाऱ्या ठेकेदार सफाई कर्मचाऱ्यांकडून दर महिन्याला खंडणी स्वरूपात रक्कम वसूल करत असल्याचा गंभीर प्रकार उघडकीस आला आहे.ज्या कर्मचाऱ्यांनी ही रक्कम देण्यास नकार दिला त्यांची बदली ठेकेदाराने दुसऱ्या ठिकाणी केली असल्याची माहिती समोर आली आहे. मुख्य म्हणजे स्वच्छता ठेकेदारामार्फत कर्मचाऱ्यांकडून कशा प्रकारे वसुली केली जात आहे. या पुराव्यांचा पेन ड्राइव्हच पावसाळी अधिवेशनाच्या सभागृहात आमदार फरांदे यांनी दाखवत कारवाईची मागणी केली होती. ज्यामध्ये कंत्राटी कर्मचाऱ्यांकडून पैशांची वसुली होत असल्याचे स्टिंग ऑपरेशनचे व्हिडीओ पुरावे म्हणून दाखवले होते. हे प्रकरण अत्यंत गंभीर असून सरकारने तातडीने हस्तक्षेप करण्याची मागणी त्यांनी केली होती. या प्रकारामुळे सफाई कर्मचाऱ्यांमध्ये संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे. याविरोधात कर्मचाऱ्यांनी आमदार देवयानी फरांदे यांच्या नेतृत्वाखाली मनपात धडक भेट दिली. त्यानंतर खंडणी वसुली प्रकरणाची नोंद संबंधित पोलीस ठाण्यामध्ये करण्याचे निर्देश मनपा आयुक्तांनी दिले याचबरोबर भद्रकाली पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राकेश चौधरी यांना तातडीने बोलावून घेत प्रकरणाची सविस्तर माहिती देण्यात आली असून कारवाई करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

Loading

Previous Post

नाशकात शिंदेंच्या शिवसेनेत जोरदार राडा

Next Post

नाशकात मनसे-शिवसेनेचा सरकार विरोधात ‘एल्गार’

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Search

No Result
View All Result
  • About
  • advertise
  • Privacy & Policy
  • Contact Us

© 2024 Black & White

No Result
View All Result
  • Home
  • महाराष्ट्र
  • देशविदेश
  • क्रीडा
  • राजकीय
  • विविध
  • शेअर बाजार
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • संपादकीय

© 2024 Black & White