• Latest
  • Trending
नाशकात मनसे-शिवसेनेचा सरकार विरोधात ‘एल्गार’

नाशकात मनसे-शिवसेनेचा सरकार विरोधात ‘एल्गार’

August 12, 2025
शुद्ध हवा विसरा… नाशिकची  हवा ‘अस्वस्थ’ करणारी

शुद्ध हवा विसरा… नाशिकची हवा ‘अस्वस्थ’ करणारी

October 16, 2026
त्र्यंबकेश्वरमध्ये 31 फूट सिंहस्थ ध्वजस्तंभाचे पूजन

त्र्यंबकेश्वरमध्ये 31 फूट सिंहस्थ ध्वजस्तंभाचे पूजन

October 15, 2026
पक्षासाठी लढणाऱ्या कार्यकर्त्यांना कधी मिळणार पदे ?

पक्षासाठी लढणाऱ्या कार्यकर्त्यांना कधी मिळणार पदे ?

October 15, 2026
नासिक मध्ये दोन कोटींचा रुग्ण घोटाळा तीन हॉस्पिटल्स वर गुन्हा दाखल

नासिक मध्ये दोन कोटींचा रुग्ण घोटाळा तीन हॉस्पिटल्स वर गुन्हा दाखल

October 14, 2026
जिनिव्हाच्या जागतिक मंचावर घुमला नाशिकच्या महापौरांचा आवाज

जिनिव्हाच्या जागतिक मंचावर घुमला नाशिकच्या महापौरांचा आवाज

October 13, 2026
नाशकात शिंदे गटाच्या नेत्यावर कोयत्याने हल्ला

कायद्याच्या बालेकिल्ल्यात तरुणांवर कोयत्याने आणि पेवर ब्लॉक ने हल्ला

October 13, 2026
नाशिकच्या कार्यक्रमात मुख्यमंत्री पोलिसांवर नाराज…

नाशिकच्या कार्यक्रमात मुख्यमंत्री पोलिसांवर नाराज…

October 11, 2026
नाशिक आणि त्र्यंबकेश्वरचा  कायापालट होणार-मुख्यमंत्री

नाशिक आणि त्र्यंबकेश्वरचा कायापालट होणार-मुख्यमंत्री

October 11, 2026
भविष्यात गणेश आणि नवरात्र उत्सव मंडळांची संख्या कमी होण्याची शक्यता ?

भविष्यात गणेश आणि नवरात्र उत्सव मंडळांची संख्या कमी होण्याची शक्यता ?

October 11, 2026
नाशिकच्या खड्ड्यांनी घेतला तेरावा बळी; नातेवाईकांचा आरोप

नाशिकच्या खड्ड्यांनी घेतला तेरावा बळी; नातेवाईकांचा आरोप

October 9, 2026
‘नटसम्राट’ची एक्झिट! ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांचे निधन

‘नटसम्राट’ची एक्झिट! ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांचे निधन

October 8, 2026
महापालिकेत “उद्यान” घोटाळा

महापालिकेत “उद्यान” घोटाळा

October 7, 2026
News Black & White
Sunday, October 18, 2026
  • Home
  • महाराष्ट्र
  • देशविदेश
  • क्रीडा
  • राजकीय
  • विविध
  • शेअर बाजार
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • संपादकीय
No Result
View All Result
News Black & White
No Result
View All Result

नाशकात मनसे-शिवसेनेचा सरकार विरोधात ‘एल्गार’

YOU MAY ALSO LIKE

शुद्ध हवा विसरा… नाशिकची हवा ‘अस्वस्थ’ करणारी

त्र्यंबकेश्वरमध्ये 31 फूट सिंहस्थ ध्वजस्तंभाचे पूजन

 १२ सप्टेंबरला काढणार संयुक्त मोर्चा

नाशिक : संपूर्ण महाराष्ट्रात महाराष्ट्र नवनिर्माण सेना व ठाकरे गटाची शिवसेना एकत्र येऊन महानगरपालिका निवडणुका लढवण्याच्या चर्चा सुरू असताना नाशकात मात्र मनसे आणि ठाकरे गटाची शिवसेना एकत्र येणार आहेत त्याला कारण म्हणजे ‘मोर्चा’ शहरात एमडी ड्रग्ज, कोकेन, महिलांवर अत्याचारांसह गुन्हेगारी वाढत आहे. तसेच हनीट्रॅप प्रकरणामुळे देखील नाशिकची बदनामी होत आहे. त्यामुळे हनीट्रॅपची चौकशी करण्यासह, शेतकऱ्यांच्या विविध समस्या याकडे प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी नाशिकमध्ये १२ सप्टेंबर रोजी ठाकरे गटाची शिवसेना आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा संयुक्त मोर्चा निघणार आहे. मनसेच्या मध्यवर्ती कार्यालयात शिवसेना ठाकरे गट आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या पदाधिकाऱ्यांची संयुक्त बैठक पार पडली. या बैठकीत मनसेचे प्रदेश सरचिटणीस दिनकर पाटील, प्रदेश उपाध्यक्ष सलीम शेख, जिल्हाध्यक्ष अंकुश पवार, शिवसेना जिल्हाध्यक्ष डी. जी. सुर्यवंशी, मनसे शहराध्यक्ष सुदाम कोंबडे, महानगरप्रमुख गीते, ग्रामीण संपर्कप्रमुख जयंत दिंडे, माजी नगरसेविका सुजाता डेरे आदी पदाधिकारी उपस्थित होते.बैठकीत दोन्ही पक्षांच्या पदाधिकाऱ्यांनी मोर्चाच्या विषयांवर चर्चा केली. यामध्ये कांद्याच्या घसरलेल्या दरांचा प्रश्न, खत-बियाण्यांमधील गैरव्यवहार, नाफेडमधील कथित भ्रष्टाचार, प्रभाग रचनेतील फेरफार, महापालिकेतील निविदा प्रक्रियेतील अपारदर्शकता, पाणीटंचाई, खड्डे, तसेच उद्याने आणि जॉगिंग ट्रॅकची झालेली दुरवस्था,काळ्या यादीतील ठेकेदारांना पुन्हा देण्यात येत असलेली कामे, स्मार्ट सिटीसह कुंभ प्रकल्पाची ऑडिट चौकशी, शेतकऱ्यांचे प्रश्नांसह कर्जमाफीचे प्रलंबित प्रकरणे, पिकविमा योजनेतील घोटाळ्याची चौकशी करणे यासह इतर मागण्यांसाठी मोर्चा काढण्यात येणार असल्याचे मनसेचे प्रदेश सरचिटणीस दिनकर पाटील आणि शिवसेना जिल्हाध्यक्ष डी. जी. सुर्यवंशी यांनी सांगितले.संयुक्त मोर्चाच्या तयारीसाठी पदाधिकारी, समर्थकांना माहिती देण्यासाठी १४ ऑगस्टपासून ते १० सप्टेंबरपर्यंत २२ बैठकांचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती देण्यात आली.मोर्चाची सुरुवात अनंत कान्हेरे मैदानावरून होऊन जिल्हाधिकारी कार्यालयावर समाप्ती होणार आहे. या मोर्चासाठी मनसे प्रमुख राज ठाकरे आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना निमंत्रण देण्यात येणार असून, जिल्हाभरातून कार्यकर्त्यांची उपस्थिती राहण्याची शक्यता यावेळी व्यक्त करण्यात आली.

Loading

Previous Post

ठेकेदार करतो सफाई कर्मचाऱ्यांकडून खंडणी वसुली

Next Post

नाशिकसह चार महापालिकांत ठाकरेंची युती ?

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Search

No Result
View All Result
  • About
  • advertise
  • Privacy & Policy
  • Contact Us

© 2024 Black & White

No Result
View All Result
  • Home
  • महाराष्ट्र
  • देशविदेश
  • क्रीडा
  • राजकीय
  • विविध
  • शेअर बाजार
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • संपादकीय

© 2024 Black & White