उपाध्यक्षपदी रवि शिरसाठ, सहचिटणीसपदी सचिन गिते-पाटील, निवडणूक पुन्हा एकदा बिनविरोध

नाशिक – जिल्हा व शहरातील मनपा अधिकृत परवानाधारक व्यावसायिक जाहिरात फलक मालकांची संघटना ‘नोवा’ अर्थात, नाशिक जिल्हा आउटडोअर ॲडव्हर्टायझिंग वेल्फेअर असोसिएशनच्या दुसऱ्या कार्यकारिणीची मुदत संपत असल्याने तिसऱ्या नवीन कार्यकारिणीची निवड प्रक्रिया मंगळवार, (दि २२) रोजी झालेल्या सर्व साधारण सभेत करण्यात आली. यात सन २०२५ ते २७ या वर्षाकरिता अध्यक्षपदी स्कायसाइन ॲडव्हर्टायझिंगचे संचालक विक्रम कदम यांची तर सरचिटणीसपदी मिडिया ट्रँगलचे संचालक गणेश बोडके यांची पुनश्च एकदा बिनविरोध निवड करण्यात आली.
असोसिएशनच्या सर्व साधारण सभा शरणपूर रोड येथील कार्यालयात संपन्न झाली. यावेळी बिनविरोध निवडीची परंपरा सलग तिसऱ्यांदा कायम ठेवत सन २०२५ – २७ या पुढील दोन वर्षांकरिता संपूर्ण कार्यकारिणीची बिनविरोध निवड करण्यात आली. यात उपाध्यक्षपदी श्री आर्टचे रवि शिरसाठ, सहचिटणीसपदी श्री साक्षी ॲडव्हर्टायझिंगचे सचिन गिते यांची तर खजिनदारपदी सौरभ पब्लिसिटीचे सौरभ जालोरी यांची निवड करण्यात आली. तर कार्यकारिणी सदस्यपदी साई साक्षी ॲडव्हर्टायझिंगचे महेश गिरमे, गॅलरी ॲडव्हर्टायझिंगचे गौरव माटे, श्री आर्टचे दीपक पवार, व्हीव्हीपी ॲडव्हर्टायझिंगचे विराज पवार यांची निवड करण्यात आली.
नाशिक, त्र्यंबकेश्वर येथे होणाऱ्या सिंहस्थ कुंभमेळ्यातील व्यावसायिक संधी, भविष्यातील आव्हाने, व्यवसायातील अडी-अडचणी, व्यवसायातील दलालांची, बाहेरील व्यावसायिकांची होणारी घुसखोरी व त्यावरील उपाय योजना तसेच नाशिक महानगरपालिकाने परवाना शुल्क व जाहिरात करात केलेली जाचक दरवाढ या विरोधातील लढा उभारण्यासंबंधी सभेत चर्चा करण्यात आली.
याववेळी नंदन दीक्षित, नितीन धारणकर, विष्णुपंत पवार, मच्छिंद्र देशमुख, संजय मालुसरे, इम्तियाज अत्तार, अमित पाटील, संजय अस्वले, सोमनाथ पाटील, दिनेश यशवंते, बंटी धनविजय, मनीष नाशिककर, निखिल सुराणा, हर्षद कुलथे, अनुप वझरे, रमेश गिते, सुरेश सोळंके, हितेश यशवंते, प्रविण खैरे, लोभेश धनविजय व नोवाचे सर्व सदस्य उपस्थित होते.

![]()















