कॉग्रेसचे निष्ठावान कमळ हाती घेण्याच्या तयारीत

नाशिक : महापालिका निवडणुकांच्या तोंडावर ठाकरे गटातील नेते भाजपात जात असतानाच आता भाजपची नजर शहरातील कॉग्रेस नेत्यांवर पडली असून कॉग्रेसचे महत्वाचे निष्ठावंत नेते भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याची राजकीय क्षेत्रात चर्चा सुरू आहे. सुरवातीच्या काळात ठाकरे गटाचे सुधाकर बडगुजर,राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या तिकीटावर निवडणूक लढवणारे गणेश गिते यांच्या भाजपात प्रवेश करण्यावरून वाद निर्माण झाले होते. यावरून शहरातील तीनही आमदारांनी दंड थोपटत सरळ सरळ मुंबई गाठत मुख्यमंत्री फडणवीस यांची भेट घेतली होती. त्यानंतर जागे झालेल्या भाजपा हायकमांडने सुकाणू समितीची निर्माण केली. यामध्ये आधी स्थानिक पातळीवर चर्चा करून मग प्रवेश देण्याचा निर्णय घेण्यात आला. यानुसार आज ठाकरे गटाचे उपनेते सुनील बागुल, माजी महानगरप्रमुख मामा राजवाडे त्याचबरोबर कॉग्रेसचे माजी नगरसेवक राहुल दिवे यांची बैठक सुकाणू समितीचे शहराध्यक्ष सुनील केदार, आ. देवयानी फरांदे, आ सीमा हिरे, आ राहुल ढिकले, माजी आ बाळासाहेब सानप, विजय साने, लक्ष्मण सावजी, गिरीश पालवे, प्रशांत जाधव, सतीश कुलकर्णी यांच्यासोबत झाल्यानंतर अखेर या नेत्यांच्या प्रवेशाला हिरवा कंदील देण्यात आला

असून मुख्यमंत्री फडणवीस रविवारी (दि 27) नाशिकच्या दौऱ्यावर येणार असून यावेळी सुनील बागुल, मामा राजवाडे, राहुल दिवे यांचे प्रवेश होणार असून यामध्ये कॉग्रेसच्या काही महत्वाच्या नेत्यांच्या नावाची चर्चा असून यामध्ये माजी नगरसेवक शाहू खैरे, वत्सला खैरे,ठाकरे गटाचे संजय चव्हाण, अपक्ष गुरुमित बग्गा आदी काँग्रेसमधील बडे नेते भाजपकडून पक्षात घेण्यासाठी हालचाली सुरू असल्याची माहिती समोर येत आहे. यामुळे ठाकरे गटानंतर नाशिक शहरात कॉग्रेस पक्षाला मोठे खिंडार पडण्याची शक्यता आहे.भाजपकडून नाशिक महापालिकेत शंभर पारचा नारा पूर्ण करण्यासाठी ही तयारी सुरू असल्याचे समजते

![]()















