काल गुन्हे दाखलत्यानंतर फरार झालेले नेते आज भाजपात

नाशिक : नाशिकमध्ये ठाकरेंच्या शिवसेनेला मोठा धक्का नसून तर मोठे खिंडार पडले आहे. नाशिकमध्ये शिवसेना ठाकरे गटातील सर्वच बड्या पदाधिकाऱ्यांनी पक्षाला रामराम ठोकला आहे. काही माजी नगरसेवक, ज्येष्ठ पदाधिकारी आज भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याची माहिती आहे. यामध्ये प्रशांत दिवे, सीमा ताजणे, सचिन मराठे या तीन माजी नगरसेवकांचा आज भाजप प्रवेश होणार आहे. त्याचबरोबर काही दिवसांपूर्वीच शिवसेना ठाकरे गटाच्या महानगरप्रमुखपदी नियुक्ती झालेले मामा राजवाडेही भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत. तीनच दिवसांपूर्वी मामा राजवाडे यांच्यावर भद्रकाली पोलीस ठाण्यात मारहाणीचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. ठाकरेंच्या शिवसेनेचे उपनेते सुनील बागुल यांच्यावर देखील गुन्हा दाखल झाला होता, ते देखील आज भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत.यांच्यासह राष्ट्रवादी शरद पवार गटाकडून विधानसभा निवडणूक लढलेले गणेश गीते आज भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत. आज भाजपात कोण करणार प्रवेश ?
सुनिल बागुल ( शिवसेना उपनेते, उबाठा )
मामा राजवाड़े ( महानगर प्रमुख, उबाठा )
गणेश गीते ( मा. स्थायी समिति सभापती, शरद पवार गट)
सचिन मराठे (उपजिल्हाप्रमुख, मा. नगरसेवक, उबाठा )
प्रशांत दिवे ( मा. नागरसेवक, उबाठा )
सिमा ताजने ( मा. नगरसेविका,उबाठा )
कमलेश बोडके ( मा. नगरसेवक )
बाळासाहेब पाठक ( जिल्हा संघटक, उबाठा )
गुलाब भोये ( उपजिल्हा प्रमुख, उबाठा )
कन्नु ताजने ( उपजिल्हा प्रमुख, उबाठा )
शंभु बागुल ( युवसेना विस्तारक, उबाठा )
अजय बागुल ( श्रमिक सेना जिल्हा प्रमुख ) ठाकरे गटाचे महत्त्वाचे नेते भाजपात जाणार असल्याने नाशिकमध्ये या भाजप प्रवेशाची आता जोरदार चर्चा रंगली आहे. उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेतून अनेक जण बाहेर पडत असल्यामुळे नाशिकमध्ये ठाकरे गटाची ताकद कमी झाली आहे. तर दुसरीकडे भाजपमध्ये इनकमिंक सुरू असल्यामुळे नाशिकमध्ये भाजपची ताकद चांगलीच वाढलेली दिसत आहे.

![]()















