गुन्हा दाखल असल्यानेच उशिरा होणार पक्षप्रवेश

नाशिक : मामा राजवाडे आणि सुनील बागूल यांचा आजचा नियोजित पक्षप्रवेश भाजपकडून थांबवण्यात आला असल्याची माहिती मिळत आहे.
काही दिवसांपूर्वीच विलास शिंदे यांनी एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश केल्याने उद्धव ठाकरे यांनी नाशिकमधील महानगरप्रमुख पदाची जबाबदारी मामा राजवाडे यांच्याकडे सोपवली होती. मात्र भाजपने त्यांनाच गळाला लावल्याने नाशिकच्या राजकारणात खळबळ उडाली आहे. मामा राजवाडे यांना ठाकरे गटाने महानगरप्रमुख केल्यानंतर नाशिक पोलिसांनी एका मारहाणप्रकरणात सुनील बागुल आणि राजवाडे यांच्यावर गुन्हा दाखल केला होता. मात्र दोघे नेते मिळत नसल्याने पोलिसांच्या दप्तरी या दोघांची नोंद फरार अशी झाली होती. परंतु, गुन्हा दाखल झालेल्या या दोघांचा आज भाजप प्रवेश होत असल्याने राजकीय क्षेत्रात चांगलीच चर्चा रंगल्याने फरार असलेल्या नेत्यांचा भाजपमध्ये प्रवेश झाल्यास राज्याचे गृहमंत्री असलेल्या देवेंद्र फडणवीस यांच्या प्रतिमेवर प्रश्नचिन्ह निर्माण होऊ शकते. त्यामुळे भाजपविषयी चुकीचा संदेश जाण्याची शक्यता बघता भाजप नेतृत्त्वाने तुर्तास सुनील बागुल आणि मामा राजवाडे यांच्या पक्षप्रवेशाला स्थगिती दिल्याची माहिती समोर आली आहे. तर दुसरीकडे ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत हे ट्विट करून म्हणतात त्यांनी पक्ष विरोधी कारवाया केल्याबद्दल उपनेते सुनील बागुल यांची शिवसेना पक्षातून हकालपट्टी करण्यात आली आहे, शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या आदेशाने ही कारवाई करण्यात आली आहे असे राऊत म्हणले आहेत.तर प्रथमेश गीते यांची नाशिक महानगर प्रमुख म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.

![]()















