• Latest
  • Trending
अखेर शिंदे गेले शिंदेंकडेच..ठाकरे गटाला केला ‘जय महाराष्ट्र’

अखेर शिंदे गेले शिंदेंकडेच..ठाकरे गटाला केला ‘जय महाराष्ट्र’

June 29, 2025
शुद्ध हवा विसरा… नाशिकची  हवा ‘अस्वस्थ’ करणारी

शुद्ध हवा विसरा… नाशिकची हवा ‘अस्वस्थ’ करणारी

October 16, 2026
त्र्यंबकेश्वरमध्ये 31 फूट सिंहस्थ ध्वजस्तंभाचे पूजन

त्र्यंबकेश्वरमध्ये 31 फूट सिंहस्थ ध्वजस्तंभाचे पूजन

October 15, 2026
पक्षासाठी लढणाऱ्या कार्यकर्त्यांना कधी मिळणार पदे ?

पक्षासाठी लढणाऱ्या कार्यकर्त्यांना कधी मिळणार पदे ?

October 15, 2026
नासिक मध्ये दोन कोटींचा रुग्ण घोटाळा तीन हॉस्पिटल्स वर गुन्हा दाखल

नासिक मध्ये दोन कोटींचा रुग्ण घोटाळा तीन हॉस्पिटल्स वर गुन्हा दाखल

October 14, 2026
जिनिव्हाच्या जागतिक मंचावर घुमला नाशिकच्या महापौरांचा आवाज

जिनिव्हाच्या जागतिक मंचावर घुमला नाशिकच्या महापौरांचा आवाज

October 13, 2026
नाशकात शिंदे गटाच्या नेत्यावर कोयत्याने हल्ला

कायद्याच्या बालेकिल्ल्यात तरुणांवर कोयत्याने आणि पेवर ब्लॉक ने हल्ला

October 13, 2026
नाशिकच्या कार्यक्रमात मुख्यमंत्री पोलिसांवर नाराज…

नाशिकच्या कार्यक्रमात मुख्यमंत्री पोलिसांवर नाराज…

October 11, 2026
नाशिक आणि त्र्यंबकेश्वरचा  कायापालट होणार-मुख्यमंत्री

नाशिक आणि त्र्यंबकेश्वरचा कायापालट होणार-मुख्यमंत्री

October 11, 2026
भविष्यात गणेश आणि नवरात्र उत्सव मंडळांची संख्या कमी होण्याची शक्यता ?

भविष्यात गणेश आणि नवरात्र उत्सव मंडळांची संख्या कमी होण्याची शक्यता ?

October 11, 2026
नाशिकच्या खड्ड्यांनी घेतला तेरावा बळी; नातेवाईकांचा आरोप

नाशिकच्या खड्ड्यांनी घेतला तेरावा बळी; नातेवाईकांचा आरोप

October 9, 2026
‘नटसम्राट’ची एक्झिट! ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांचे निधन

‘नटसम्राट’ची एक्झिट! ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांचे निधन

October 8, 2026
महापालिकेत “उद्यान” घोटाळा

महापालिकेत “उद्यान” घोटाळा

October 7, 2026
News Black & White
Saturday, October 17, 2026
  • Home
  • महाराष्ट्र
  • देशविदेश
  • क्रीडा
  • राजकीय
  • विविध
  • शेअर बाजार
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • संपादकीय
No Result
View All Result
News Black & White
No Result
View All Result

अखेर शिंदे गेले शिंदेंकडेच..ठाकरे गटाला केला ‘जय महाराष्ट्र’

YOU MAY ALSO LIKE

शुद्ध हवा विसरा… नाशिकची हवा ‘अस्वस्थ’ करणारी

त्र्यंबकेश्वरमध्ये 31 फूट सिंहस्थ ध्वजस्तंभाचे पूजन

माजी नगरसेवकांनी हाती घेतला “धनुष्यबाण”

नाशिक : महानगरपालिकेच्या निवडणुकांचे पडघम केव्हाही वाजण्याची शक्यता बघता शहरात पक्षांतराचे वारे सुसाट वाहू लागले आहेत. काही दिवसांपूर्वी खा संजय राऊत यांचे निकटवर्तीय सुधाकर बडगुजर यांची ठाकरे गटाच्या शिवसेनेतून हकालपट्टी झाल्यानंतर त्यांनी भाजपात प्रवेश केला. यादरम्यान ठाकरे गटाचे महानगरप्रमुख विलास शिंदे नाराज असल्याची जोरदार चर्चा राजकीय वर्तुळात सुरू होती. विलास शिंदे यांच्या मुलीच्या लग्नात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी हजेरी लावत शिंदे हे शिंदेंकडेच येणार असे सूचक विधान देखील केले होते त्यानंतर पुन्हा एकदा नाशिक दौऱ्यावर असलेले एकनाथ शिंदे यांचे स्वागत विलास शिंदे यांनी केले होते. या दोन भेटीनंतर शिंदे नक्कीच ठाकरे गटाला जय महाराष्ट्र करत शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश करणार हे निश्चित झाले . त्यानंतर शुक्रवारी (दि 27) च्या रात्री खा. संजय राऊत यांनी विलास शिंदे यांना महानगरप्रमुख पदावरून हटवत मामा राजवाडे यांच्याकडे महानगरप्रमुख पद सोपवले. त्यानंतर आज आज रविवारी (दि. 29) सकाळीच मोठं शक्ती प्रदर्शन करत मुंबईच्या दिशेने विलास शिंदे रवाना झाले. दरम्यान आज पक्ष प्रवेशावेळी विलास शिंदे यांच्याकडून उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना चांदीची तलवार देखील भेट देण्यात आली. विलास शिंदे यांच्यासह नाशिकमधील काही नगरसेवकांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश केला. यामध्ये माजी नगरसेवक संतोष गायकवाड, नयना गांगुर्डे, विष्णूपंत बेडकुळे, पल्लवी पाटील, उषा शेळके, निलेश ठाकरे यांच्यासह पंचायत समिती सदस्य, आणि सरपंचांनी देखील शिंदे गटाच्या शिवसेनेत प्रवेश केला.मात्र महिनाभरात ठाकरे गटाच्या शिवसेनेला हा दुसरा धक्का मानला जात आहे. यावेळी जिल्हाप्रमुख अजय बोरस्ते, महानगरप्रमुख बंटी तिदमे यांच्यासह नाशिकचे प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते.

Loading

Previous Post

धक्कादायक : चिमुकलीचा खून करत पोलीस पित्याची आत्महत्या

Next Post

नाशकात ठाकरे गटाला मोठे खिंडार,दिग्गज भाजपात

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Search

No Result
View All Result
  • About
  • advertise
  • Privacy & Policy
  • Contact Us

© 2024 Black & White

No Result
View All Result
  • Home
  • महाराष्ट्र
  • देशविदेश
  • क्रीडा
  • राजकीय
  • विविध
  • शेअर बाजार
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • संपादकीय

© 2024 Black & White