हृदयद्रावक घटनेने पोलीस दलात हळहळ

नाशिक : नाशिकमध्ये एक धक्कादायक घटना उघडकीस आली असून पोलिस शिपायाने स्वतःच्या सात वर्षांच्या मुलीला गळफास लावून संपवलं. त्यानंतरल त्याने स्वतःही गळफास लावून आत्महत्या केली. या घटनेने पोलीस दलात खळबळ उडाली आहे. मिळालेल्या माहितीनुसार जेलरोडच्या शिवाजीनगर भागातील मॉडेल कॉलनीत राहणारे स्वप्नील दीपक गायकवाड (वय 36) हे मागील तीन वर्षांपासून उपनगर पोलीस ठाण्यात नेमणुकीला होते. वर्षभरापासून पत्नीसोबत घटस्फोट झाल्यानंतर भैरवी स्वप्नील गायकवाड (वय 7) या मुलीचा स्वता सांभाळ करत वृद्ध आई-वडिलांबरोबर राहत होते. गायकवाड हे मागील काही दिवसांपासून आजारी होते. राहत्या घरापासून हाकेच्या अंतरावर योगमाला इमारतीत त्यांचा स्वतःचा चौथ्या मजल्यावर प्लॅट आहे. भाडेकरू नसल्यामुळे तो प्लॅट रिकामा आहे. मंगळवारी दुपारी तीन वाजेच्या दरम्यान मुलगी भैरवीस घेऊन स्वप्नील गायकवाड त्या प्लॅटवर गेले त्यानंतर सायंकाळी सहा वाजता भैरवीचा क्लास असल्याने ती आली नाही म्हणून स्वप्नीलची आई हिराबाई या त्या फ्लॅटवर नातीला बघण्यासाठी गेल्या असता दरवाजा वाजूनही आतून प्रतिसाद आला नाही तसेच मुलगा स्वप्निल हा फोन देखील उचलत नसल्याने त्यांनी त्यांच्या मुलीची मोठी मुलगी पूनम सोमासे तिला फोन करून तात्काळ बोलविले. दरवाजा उघडत नसल्यामुळे हिराबाई व त्यांची नात पूनम यांनी रहिवाशांच्या मदतीने फ्लॅटचा दरवाजा तोडून आतमध्ये प्रवेश केला असता बापलेक समोरासमोरील भिंतीला बांधलेल्या नायलॉन द्वारे द्वारे गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळले. जन्मदात्यापित्याने सात वर्षाच्या भैरवीला नायलॉनच्या दोरीने अगोदर गळफास दिला यानंतर त्या दोरीने स्वतःही गळफास घेतल्याचे पोलिसांनी सांगितले दोरी तुटल्यामुळे स्वप्नील हा मूर्त अवस्थेत जमिनीवर पडलेला पोलिसांना मिळून आला. नैराश्यातून अत्यंत टोकाचे पाऊल.. काही वर्षांपूर्वी मोठ्या भावाचा दुर्धर आजाराने झालेला मृत्यू त्यानंतर काही वर्षांनी दुसऱ्या विवाहित भावाने रेल्वे रुळावर केलेली आत्महत्या काही महिन्यांपूर्वी दुचाकी वर मावस भावा सोबत जाताना झालेल्या अपघातात भावाचा झालेला मृत्यू आणि वर्षभरापूर्वी झालेला घटस्फोट अशा घटनांच्या चक्रात अडकल्याने पोलीस दलात असलेले स्वप्नील गायकवाड यांनी वैफल्यग्रस्त होत टोकाचे पाऊल उचलून आपल्या पोटच्या मुलीचा खून केल्याने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.काही महिन्यांपूर्वी दुचाकीने अपघात झाल्याने स्वप्नील यांना गंभीर दुखापत झाली होती. त्याच्या शस्त्रक्रियेसाठी व औषध उपचारासाठी मोठा खर्च लागणार होता. त्यावेळी उपनगर पोलिसांनी आर्थिक मदत निधी उभारत स्वप्नील यास मदत केली होती. स्वप्निल गायकवाड हे 2014 साली पोलीस दलात भरती झाले होते पोलीस शिपाई म्हणून उपनगर पोलीस ठाण्यात मागील तीन वर्षापासून त्यांची नेमणूक होती.

![]()















