• Latest
  • Trending
भुजबळांकडे मागितली 1 कोटींची खंडणी

भुजबळांकडे मागितली 1 कोटींची खंडणी

May 17, 2025
शुद्ध हवा विसरा… नाशिकची  हवा ‘अस्वस्थ’ करणारी

शुद्ध हवा विसरा… नाशिकची हवा ‘अस्वस्थ’ करणारी

October 16, 2026
त्र्यंबकेश्वरमध्ये 31 फूट सिंहस्थ ध्वजस्तंभाचे पूजन

त्र्यंबकेश्वरमध्ये 31 फूट सिंहस्थ ध्वजस्तंभाचे पूजन

October 15, 2026
पक्षासाठी लढणाऱ्या कार्यकर्त्यांना कधी मिळणार पदे ?

पक्षासाठी लढणाऱ्या कार्यकर्त्यांना कधी मिळणार पदे ?

October 15, 2026
नासिक मध्ये दोन कोटींचा रुग्ण घोटाळा तीन हॉस्पिटल्स वर गुन्हा दाखल

नासिक मध्ये दोन कोटींचा रुग्ण घोटाळा तीन हॉस्पिटल्स वर गुन्हा दाखल

October 14, 2026
जिनिव्हाच्या जागतिक मंचावर घुमला नाशिकच्या महापौरांचा आवाज

जिनिव्हाच्या जागतिक मंचावर घुमला नाशिकच्या महापौरांचा आवाज

October 13, 2026
नाशकात शिंदे गटाच्या नेत्यावर कोयत्याने हल्ला

कायद्याच्या बालेकिल्ल्यात तरुणांवर कोयत्याने आणि पेवर ब्लॉक ने हल्ला

October 13, 2026
नाशिकच्या कार्यक्रमात मुख्यमंत्री पोलिसांवर नाराज…

नाशिकच्या कार्यक्रमात मुख्यमंत्री पोलिसांवर नाराज…

October 11, 2026
नाशिक आणि त्र्यंबकेश्वरचा  कायापालट होणार-मुख्यमंत्री

नाशिक आणि त्र्यंबकेश्वरचा कायापालट होणार-मुख्यमंत्री

October 11, 2026
भविष्यात गणेश आणि नवरात्र उत्सव मंडळांची संख्या कमी होण्याची शक्यता ?

भविष्यात गणेश आणि नवरात्र उत्सव मंडळांची संख्या कमी होण्याची शक्यता ?

October 11, 2026
नाशिकच्या खड्ड्यांनी घेतला तेरावा बळी; नातेवाईकांचा आरोप

नाशिकच्या खड्ड्यांनी घेतला तेरावा बळी; नातेवाईकांचा आरोप

October 9, 2026
‘नटसम्राट’ची एक्झिट! ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांचे निधन

‘नटसम्राट’ची एक्झिट! ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांचे निधन

October 8, 2026
महापालिकेत “उद्यान” घोटाळा

महापालिकेत “उद्यान” घोटाळा

October 7, 2026
News Black & White
Sunday, October 18, 2026
  • Home
  • महाराष्ट्र
  • देशविदेश
  • क्रीडा
  • राजकीय
  • विविध
  • शेअर बाजार
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • संपादकीय
No Result
View All Result
News Black & White
No Result
View All Result

भुजबळांकडे मागितली 1 कोटींची खंडणी

YOU MAY ALSO LIKE

नाशिकमध्ये मित्राने मोबाईलचा रिमोट ॲक्सेस घेतला आणि विवाहितेने जीवन संपवलं

नाशिकचा ‘तो’ नेता तुरुंगातून लढविणार निवडणूक

खंडणीखोर तरुण पोलिसांनी केला गजाआड

नाशिक : माजी उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांना एक कोटी रुपयांची खंडणी मागितल्याचा प्रकार समोर आल्यानंतर राजकीय क्षेत्रात मोठी खळबळ उडाली होती मात्र प्रकरणी नाशिक पोलिसांनी सापळा रचून संबंधित आरोपीला अटक करण्यात यश मिळविले आहे . मिळालेल्या माहितीनुसार छगन भुजबळ यांचे खासगी सहाय्यक संतोष गायकवाड यांना अनोळखी क्रमांकावरून वारंवार कॉल येत होते. फोन करणारा इसम स्वतःला आयकर अधिकारी सांगून त्र्यंबकेश्वर येथील फार्म हाऊसवर रेड पडणार असल्याची धमकी देत मदतीच्या मोबदल्यात १ कोटी रुपये मागत होता. पैसे न दिल्यास कारवाई करण्याची धमकी त्याने गायकवाड यांना दिली होती. अखेर या घटनेची माहिती नाशिक पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांना देण्यात आली.त्यानंतर पोलीस उप-आयुक्त (गुन्हे) प्रशांत बच्छाव यांना कारवाईचे आदेश देण्यात आले

त्यानुसार वरिष्ठ पोलीस निरीक्षक मधुकर कड यांच्या मार्गदर्शनाखाली पथकाने सापळा रचत गायकवाड यांना गुजरातच्या धरमपूर येथे बोलावून आरोपीस पैसे देण्यासाठी आणण्यास सांगितले. त्यानुसार पोलिसांनी डमी नोटा आणि काही खरी रक्कम पंच साक्षीदारांच्या माध्यमातून आरोपीकडे देण्याचे ठरवले.धरमपूर येथे आरोपीची वाट पाहूनही तो न आल्याने पथक परतीच्या मार्गावर असताना आरोपीने पुन्हा संपर्क साधून करंजाळी येथील हॉटेल रितम व्हॅली येथे येण्यास सांगितले. येथे सापळा लावून पोलीसांनी संशयित आरोपी राहुल दिलीप भुसारे (वय २७, रा. करंजाळी, ता. पेठ) यास रंगेहाथ अटक केली. आरोपीकडून एक होंडा शाईन मोटारसायकल, मोबाईल फोन, ५०० रुपयांच्या ६० खऱ्या नोटा, तसेच खेळण्यातल्या नोटांचे १५ बंडल (एकूण अंदाजे ८५,५०० रुपये किंमतीचा मुद्देमाल) जप्त करण्यात आला आहे. या प्रकरणी अंबड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास अंबड पोलीस करत आहेत. पोलीस आयुक्त संदीप कर्णिक, पोलीस उप-आयुक्त (गुन्हे) प्रशांत बच्छाव, सहायक पोलीस आयुक्त संदीप मिटके यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली. राहुल हा उच्चशिक्षित असून त्याचे यापुर्वी कुठलेही गुन्हेगारी रेकॉर्ड नसून केवळ झटपट पैसे कमविण्याच्या उद्देशाने त्याने हा प्रकार केला असून आरोपी हा फोन करण्यासाठी स्वतःचा मोबाईल वापरत नव्हता. तो एखाद्या हॉटेलमधील ग्राहकाचा किंवा ट्रक ड्रायव्हर यांचा फोन वापरायचा. त्यामुळे त्याला पकडायला थोडा उशीर झाला, अशी माहिती पोलिसांनी दिली.

Loading

Previous Post

तर महावितरणच्या अधिकाऱ्यांवर कारवाई- आ. फरांदे

Next Post

भारताच्या शत्रूची पाकमध्ये गोळ्या घालून हत्या

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Search

No Result
View All Result
  • About
  • advertise
  • Privacy & Policy
  • Contact Us

© 2024 Black & White

No Result
View All Result
  • Home
  • महाराष्ट्र
  • देशविदेश
  • क्रीडा
  • राजकीय
  • विविध
  • शेअर बाजार
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • संपादकीय

© 2024 Black & White