मान्सूनपूर्व कामांच्या आढावा बैठकीत अधिकाऱ्यांची कानउघाडणी

नाशिक : गेल्या अनेक दिवसांपासून शहरात अगदी रिमझिम पाऊस पडला किंवा थोडा जरी वारा सुरू झाला की तासन तास विद्युत पुरवठा खंडित होण्याचा प्रकार घडतात दिसतो त्यानंतर वैतागून नागरिकांनी महावितरणच्या अधिकाऱ्यांना अथवा कर्मचाऱ्यांना फोन केला तर फोन न उचलण्याचे प्रकार घडत असल्याने अशा प्रकारच्या तक्रारी प्राप्त झाल्यास त्या अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याचा इशारा आमदार देवयानी फरांदे यांनी दिला आहे. शहरातील मान्सूनपूर्व तयारीचा आढावा घेण्यासाठी आमदार देवयानी फरांदे यांनी विविध शासकीय विभागांची बैठक आयोजित केली होती. फरांदे यांच्या निवासस्थानी झालेल्या बैठकीत महानगरपालिका कार्यकारी अभियंता रविंद्र बागुल, कार्यकारी अभियंता संदेश शिंदे, कार्यकारी अभियंता गणेश मैंद, उद्यान अधीक्षक विवेक भदाणे, महावितरण कंपनी कार्यकारी अभियंता वाढे, कार्यकारी अभियंता जाधव, उपअभियंता बोरसे, उपअभियंता पवार व इतर अधिकारी उपस्थित होते यावेळी फरांदे यांनी महावितरण कंपनीच्या कामाबाबत प्रचंड नाराजी व्यक्त करताना मान्सून पूर्वतयारी करताना महावितरण कंपनीने तसेच महानगरपालिकेने झाडांची छाटणी करणे गरजेचे आहे ही छाटणी करताना पालापाचोळा गटारीत जाणार नाही याची दक्षता घेण्याचे त्यांनी सांगितले. महानगरपालिकेच्या कर्मचाऱ्यांनी देखील गटारी व पावसाळी गटारी स्वच्छ करून घ्याव्यात जेणेकरून पावसाचे पाणी लवकर वाहून जाण्यास मदत होईल. आणि ज्या ठिकाणी नागरिकांनी गतिरोधकाची मागणी केलेली आहे हे गतिरोधक लवकरात लवकर लावून देण्यात यावेत. असे आदेश देखील फरांदे यांनी अधिकाऱ्यांना दिली आहेत.

![]()















