आमदार देवयानी फरांदे यांची बैठकित पोलीस मनपा अधिकाऱ्यांना तंबी

नाशिक : इंदिरानगर परिसरातील वाढते अतिक्रमण ही नागरिकांची डोकेदुखी ठरत असून त्याचबरोबर इंदिरानगर, शिवाजीवाडी,भाभानगर या परिसरात असलेल्या लॉन्समुळे वाहतुकीला होणारी अडचण व वाढती गुन्हेगारी यासंदर्भात मध्य नाशिकच्या आमदार देवयानी फरांदे यांनी मनपा अधिकारी व पोलीस प्रशासन यांची बैठक घेत पुढच्या 18 दिवसात कारवाई करण्याची तंबी दिली. वडाळा गावाकडे जाणाऱ्या रस्त्यावर असलेल्या सायकल ट्रॅक वर मुले -मुली अश्लील चाळे करत असून त्याचबरोबर याठिकाणी नशेखोरांचा सुळसुळाट झाला आहे तरुण मुले एमडी ड्रग्ज, गांजा आदींचे सेवन करत असल्याच्या तक्रारी आमदार देवयानी फरांदे यांना प्राप्त झाल्या होत्या. त्याचबरोबर अशोका हॉस्पिटलच्या रस्त्यावर दुतर्फा दुचाकी व चारचाकी लावल्या जात असल्यामुळे अपघात घडण्याची शक्यता वाढली आहे. तर वडाळा गाव व वडाळा रस्त्यांवरील जनावरांचे गोठे स्थलांतरित करण्याची मागणी देखील यावेळी करण्यात आली. प्रभाग क्रमांक 23 व 30 मध्ये अनधिकृत लॉन्स धारकांनवर कारवाईची देखील मागणी करण्यात आली ही बैठक आमदार देवयानी फरांदे यांच्या अध्यक्षतेखाली अशोका रुग्णालयाच्या हॉलमध्ये घेण्यात आली. या बैठकीला माजी महापौर सतीश कुलकर्णी, पोलीस उपायुक्त प्रशांत बच्छाव, चंद्रकांत खांडवी, अतिक्रमण विभागाचे उपायुक्त मयूर पाटील,माजी नगरसेवक यशवंतराव निकुळे, चंद्रकांत खोडे, सुनील खोडे,सुप्रिया खोडे अँड अजिंक्य साने, वरिष्ठ पोलीस निरीक्षक संतोष नरोटे, जितेंद्र सपकाळ, दिवाण सिंग, देविदास वांजळे, सहायक पोलिस निरीक्षक सुनील अनकोलीकर यांच्यासह व महापालिका अधिकारी, पोलिस,माजी नगरसेवक, पदाधिकारी उपस्थित होते. महापालिका आयुक्तांना निवेदन प्रभाग क्रमांक 23 मधील अतिक्रमण हटवण्यासाठी महापालिका आयुक्त मनीषा खत्री यांना माजी नगरसेवक व प्रभागातील नागरिकांच्या वतीने निवेदन देण्यात आले. या निवेदनात परिसरातील लॉन्सचे वाढते अतिक्रमण त्याचबरोबर साईनाथ चौक सिग्नल, अशोका मार्ग, विनयनगर या परिसरात वाढत्या टपऱ्या,पत्र्याचे शेड काढण्याची मागणी निवेदनात करण्यात आली आहे.


![]()















