100,200 रुपयात कपल्सला कोपरे उपलब्ध करून देत होते कॅफेवाले

नाशिक : शहरातील कॉलेज रोड, गंगापूर रोड परिसरात असलेल्या कॅफेनमध्ये अनेक गैरप्रकार चालत असल्याच्या तक्रारी अनेक दिवसांपासून चर्चेत असताना आज गंगापूर रोड परिसरात एका कॅफेवर तरुण-तरुणींचे अश्लील चाळे सुरु असल्याची माहिती मिळताच नाशिक मध्य विधानसभा मतदारसंघाच्या भाजपच्या आमदार देवयानी फरांदे यांनी छापा टाकला. त्यावेळी कॅफेमध्ये सुरु असलेले प्रकार पाहून त्यांना धक्काच बसला. यानंतर पोलिसांनी घटनास्थळी दाखल होत पाच ते सहा प्रेमी युगुलांना ताब्यात घेतले. मिळालेल्या माहितीनुसार गंगापूर रोड परिसरातील विद्या विकास सर्कल परिसरात गेल्या अनेक वर्षांपासून अ’मोगलीज’ नावाचा कॅफे सुरू आहे. धक्कादायक म्हणजे या कॅफेमध्ये तरुण मुला मुलींना 100 ते 200 रुपयांत रूम दिले जात असल्याची धक्कादायक माहिती समोर आल्यानंतर आमदार फरांदे यांनी पोलिसांसह सदर कॅफेवर छापा टाकला असता याठिकाणी तरुण-तरुणी अश्लील चाळे करत असल्याचे दिसून आले यावेळी पाच ते सहा प्रेमी युगुलांना पोलिसांनी ताब्यात घेतले आले. त्यांची सध्या चौकशी केली जात आहे. तसेच त्यांच्या पालकांना पाचारण करून त्यांचे समुपदेशन देखील करण्यात येणार आहे. मुख्य म्हणजे ड्रग्ज प्रकरणात देखील नाशिक शहराचे नाव देशाच्या कानाकोपऱ्यात गेले असून नाशिकरोड परिसरात तर ड्रग्जचा कारखानाच उध्वस्त करण्यात आला होता. या ड्रग्जचे लोण शहरातील इंदिरानगर, गंगापूर, कॉलेजरोड या उचभ्रू वस्तीपासून तर कष्टकरी असलेल्या वडाळा गावापर्यंत गेले होते यादरम्यान तर वडाळा गावात एमडी ड्रग्ज विक्री करणारे रॅकेट देखील गजाआड करण्यात आले होते याठिकाणी असलेल्या अशोका हॉस्पिटल समोर असलेले अनेक कॅफे महानगरपालिका व पोलिसांनी उध्वस्त करत तरुण -तरुणी त्यांच्यासोबत उडणारा धूर बंद करण्यात आला होता. आणि आज ‘अ मोगली’ या कॅफेच्या तक्रारी आल्यानंतर भारतीय जनता पक्षाच्या मध्य नाशिकच्या आमदार देवयानी फरांदे यांनी पोलिसांसह धाड टाकत कारवाई केली.मात्र याच परिसरातील अनेक कॅफेनमध्ये पडदे लावून तरुण- तरुणींची सोय करण्यात येत असल्याची धक्कादायक चर्चा असून काही दिवसांपूर्वी दारू पिऊन पोलिसांबरोबर वाद घालणाऱ्या तरुणीचा व्हिडीओ प्रचंड व्हायरल झाला होता.सरकारवाडा व गंगापूर रोड पोलीस स्टेशनच्या सीमेवर अनेक वर्षांपासून कॅफे सुरू असताना पोलिसांना याचा थांग-पत्ता लागू नये याबाबत सर्वत्र आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे.त्याचबरोबर या कॅफेवाल्याना कोणत्या राजकीय नेत्यांचा आशीर्वाद आहे का ? याचीच चर्चा दिवसभर संपूर्ण नाशिक शहरात होती.


![]()












