दिल्लीतून सूत्रे फिरल्याची चर्चा

नाशिक : पालकमंत्रिपदावरुन अनेक चर्चा सुरु आहेत.याच पार्श्वभूमीवर आता नाशिक पालकमंत्री पदाचा तिढा अखेर सुटला असल्याची सूत्रांची माहिती मिळत आहे.नाशिकचे पालकमंत्री पद भाजपकडेच राहणार असून गिरीश महाजन नाशिकचे पालकमंत्री होणार असल्याची माहिती मिळत असून सिहस्थ कुंभमेळ्यामुळे नाशिकचे पालकमंत्री पद अन्य कुणाला दिले जाणार नाही असे सूतोवाच भाजपच्या दिल्लीतील वरिष्ठ नेत्याने केले आहे. नाशिकचे पालकमंत्रीपद गिरीश महाजनांकडेच देण्यात आलं असून आता रायगडचा तिढा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांनी एकत्र बसून सोडवावा असं दिल्लीतून सांगण्यात आल्याची माहिती मिळत आहे.

![]()












