• Latest
  • Trending
किरकोळ कारणावरून बायकोचा खून

किरकोळ कारणावरून बायकोचा खून

February 5, 2025
शुद्ध हवा विसरा… नाशिकची  हवा ‘अस्वस्थ’ करणारी

शुद्ध हवा विसरा… नाशिकची हवा ‘अस्वस्थ’ करणारी

October 16, 2026
त्र्यंबकेश्वरमध्ये 31 फूट सिंहस्थ ध्वजस्तंभाचे पूजन

त्र्यंबकेश्वरमध्ये 31 फूट सिंहस्थ ध्वजस्तंभाचे पूजन

October 15, 2026
पक्षासाठी लढणाऱ्या कार्यकर्त्यांना कधी मिळणार पदे ?

पक्षासाठी लढणाऱ्या कार्यकर्त्यांना कधी मिळणार पदे ?

October 15, 2026
नासिक मध्ये दोन कोटींचा रुग्ण घोटाळा तीन हॉस्पिटल्स वर गुन्हा दाखल

नासिक मध्ये दोन कोटींचा रुग्ण घोटाळा तीन हॉस्पिटल्स वर गुन्हा दाखल

October 14, 2026
जिनिव्हाच्या जागतिक मंचावर घुमला नाशिकच्या महापौरांचा आवाज

जिनिव्हाच्या जागतिक मंचावर घुमला नाशिकच्या महापौरांचा आवाज

October 13, 2026
नाशकात शिंदे गटाच्या नेत्यावर कोयत्याने हल्ला

कायद्याच्या बालेकिल्ल्यात तरुणांवर कोयत्याने आणि पेवर ब्लॉक ने हल्ला

October 13, 2026
नाशिकच्या कार्यक्रमात मुख्यमंत्री पोलिसांवर नाराज…

नाशिकच्या कार्यक्रमात मुख्यमंत्री पोलिसांवर नाराज…

October 11, 2026
नाशिक आणि त्र्यंबकेश्वरचा  कायापालट होणार-मुख्यमंत्री

नाशिक आणि त्र्यंबकेश्वरचा कायापालट होणार-मुख्यमंत्री

October 11, 2026
भविष्यात गणेश आणि नवरात्र उत्सव मंडळांची संख्या कमी होण्याची शक्यता ?

भविष्यात गणेश आणि नवरात्र उत्सव मंडळांची संख्या कमी होण्याची शक्यता ?

October 11, 2026
नाशिकच्या खड्ड्यांनी घेतला तेरावा बळी; नातेवाईकांचा आरोप

नाशिकच्या खड्ड्यांनी घेतला तेरावा बळी; नातेवाईकांचा आरोप

October 9, 2026
‘नटसम्राट’ची एक्झिट! ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांचे निधन

‘नटसम्राट’ची एक्झिट! ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांचे निधन

October 8, 2026
महापालिकेत “उद्यान” घोटाळा

महापालिकेत “उद्यान” घोटाळा

October 7, 2026
News Black & White
Sunday, October 18, 2026
  • Home
  • महाराष्ट्र
  • देशविदेश
  • क्रीडा
  • राजकीय
  • विविध
  • शेअर बाजार
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • संपादकीय
No Result
View All Result
News Black & White
No Result
View All Result

किरकोळ कारणावरून बायकोचा खून

YOU MAY ALSO LIKE

नाशिकमध्ये मित्राने मोबाईलचा रिमोट ॲक्सेस घेतला आणि विवाहितेने जीवन संपवलं

नाशिकचा ‘तो’ नेता तुरुंगातून लढविणार निवडणूक

कोयता आणि कुकरच्या झाकणाने वार

नाशिक : गंगापूररोड परिसरात घरातील आपापसांतील वाद पराकोटीला गेल्याने नवऱ्याने रागाच्या भरात बायकोच्या डोक्यात कोयता व कुकरच्या झाकणाने वार करून खून केल्याने परिसरात खळबळ उडाली आहे. मिळालेल्या माहितीनुसार गंगापूररोडवरील डी.के. नगर भागात असलेल्या स्वास्तिक निवास (बी-विंग) सोसायटीच्या चौथ्या मजल्यावर गोरे परिवार हे मुलासह भाडेतत्त्वावर सोसायटीत राहतात. काल मुलगा सकाळच्या सुमारास कामावर निघून गेला असता पती-पत्नी घरात एकटेच होते त्यांना दुसरीकडे राहण्यास जायचे असल्यामुळे घरात सामानाची आवरासावर सुरू असतानाच पत्नी सविता छत्रगुन गोरे (वय 45) व पती छत्रगुन गोरे (वय 50)यांच्यात जोरदार भांडण सुरू झाले. यादरम्यान गोरे यांची मुलगी मुक्ता हिला गॅसची टाकी हवी असल्याने तिने आपल्या आईला फोन केला होता .टाकी घेण्यासाठी मुक्ता सोसायटीच्या आवारात आली होती यादरम्यान ती वर गेली असता दरवाजा आतून बंद होता यावेळी छत्रगुन याने दरवाजा उघडला असता आई रक्तबंबाळ अवस्थेत रूममध्ये पडलेली दिसली यादरम्यान मुक्ता शेजारच्याकडे मदतीसाठी धावली असता छत्रगुन पळण्यात यशस्वी झाला. यावेळी छत्रगुन याने रागाच्या भरात बायकोच्या डोक्यात कुकरच्या झाकणाने प्रहार केला यामुळे सविता गोरे या रक्तबंबाळ अवस्थेत लाकडी पलंगावर कोसळल्या. सोसायटीतील लोकांनी घटनेची माहिती गंगापूर पोलिसांना कळविली. माहिती मिळताच गंगापूर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुशील जुमडे, पोलीस निरीक्षक राजपूत यांनी पथकासह घटनास्थळी धाव घेतली. पंचनामा करून मृतदेह शासकीय जिल्हा रुग्णालयात हलविण्यात आला. मुलगी मुक्ता लिखे हिने दिलेल्या फिर्यादीवरून छत्रगुन गोरे याच्याविरुद्ध गंगापूर पोलीस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्याच्या शोधार्थ गुन्हे शोध पथकासह अन्य दोन पथके रवाना करण्यात आली आहेत. पतीला दारूचे व्यसन असून पती-पत्नीमध्ये सातत्याने भांडण होत असायचे हा गुन्हा छत्रगुन येणे केल्याचे प्रथम दर्शनी समोर आले आहे. त्याचा शोध घेतला जात असल्याची माहिती पोलिसांनी दिली. मुलीने इच्छेविरुद्ध लग्न केल्याने कुटुंबामध्ये सतत भांडण होत असल्याची माहिती मिळत आहे.

Loading

Previous Post

मराठीत बोला अन्यथा,शिस्त भंगाची कारवाई

Next Post

राष्ट्रवादी नेत्याच्या बॅनरवर मोदी-फडणवीसांना स्थान

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Search

No Result
View All Result
  • About
  • advertise
  • Privacy & Policy
  • Contact Us

© 2024 Black & White

No Result
View All Result
  • Home
  • महाराष्ट्र
  • देशविदेश
  • क्रीडा
  • राजकीय
  • विविध
  • शेअर बाजार
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • संपादकीय

© 2024 Black & White