• Latest
  • Trending
नाशिक जिल्ह्याला मिळणार दोन पालकमंत्री ?

नाशिक जिल्ह्याला मिळणार दोन पालकमंत्री ?

January 27, 2025
शुद्ध हवा विसरा… नाशिकची  हवा ‘अस्वस्थ’ करणारी

शुद्ध हवा विसरा… नाशिकची हवा ‘अस्वस्थ’ करणारी

October 16, 2026
त्र्यंबकेश्वरमध्ये 31 फूट सिंहस्थ ध्वजस्तंभाचे पूजन

त्र्यंबकेश्वरमध्ये 31 फूट सिंहस्थ ध्वजस्तंभाचे पूजन

October 15, 2026
पक्षासाठी लढणाऱ्या कार्यकर्त्यांना कधी मिळणार पदे ?

पक्षासाठी लढणाऱ्या कार्यकर्त्यांना कधी मिळणार पदे ?

October 15, 2026
नासिक मध्ये दोन कोटींचा रुग्ण घोटाळा तीन हॉस्पिटल्स वर गुन्हा दाखल

नासिक मध्ये दोन कोटींचा रुग्ण घोटाळा तीन हॉस्पिटल्स वर गुन्हा दाखल

October 14, 2026
जिनिव्हाच्या जागतिक मंचावर घुमला नाशिकच्या महापौरांचा आवाज

जिनिव्हाच्या जागतिक मंचावर घुमला नाशिकच्या महापौरांचा आवाज

October 13, 2026
नाशकात शिंदे गटाच्या नेत्यावर कोयत्याने हल्ला

कायद्याच्या बालेकिल्ल्यात तरुणांवर कोयत्याने आणि पेवर ब्लॉक ने हल्ला

October 13, 2026
नाशिकच्या कार्यक्रमात मुख्यमंत्री पोलिसांवर नाराज…

नाशिकच्या कार्यक्रमात मुख्यमंत्री पोलिसांवर नाराज…

October 11, 2026
नाशिक आणि त्र्यंबकेश्वरचा  कायापालट होणार-मुख्यमंत्री

नाशिक आणि त्र्यंबकेश्वरचा कायापालट होणार-मुख्यमंत्री

October 11, 2026
भविष्यात गणेश आणि नवरात्र उत्सव मंडळांची संख्या कमी होण्याची शक्यता ?

भविष्यात गणेश आणि नवरात्र उत्सव मंडळांची संख्या कमी होण्याची शक्यता ?

October 11, 2026
नाशिकच्या खड्ड्यांनी घेतला तेरावा बळी; नातेवाईकांचा आरोप

नाशिकच्या खड्ड्यांनी घेतला तेरावा बळी; नातेवाईकांचा आरोप

October 9, 2026
‘नटसम्राट’ची एक्झिट! ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांचे निधन

‘नटसम्राट’ची एक्झिट! ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांचे निधन

October 8, 2026
महापालिकेत “उद्यान” घोटाळा

महापालिकेत “उद्यान” घोटाळा

October 7, 2026
News Black & White
Sunday, October 18, 2026
  • Home
  • महाराष्ट्र
  • देशविदेश
  • क्रीडा
  • राजकीय
  • विविध
  • शेअर बाजार
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • संपादकीय
No Result
View All Result
News Black & White
No Result
View All Result

नाशिक जिल्ह्याला मिळणार दोन पालकमंत्री ?

YOU MAY ALSO LIKE

अखेर नगरसेवक प्रविण तिदमे यांची नाराजी दूर

नासिकमध्ये महिला नेत्याने उमेदवारी अर्ज मागे घेतला आणि…….

कुंभमेळा व महापालिका निवडणुका बघता शिंदे गटाची खेळी

नाशिक : महायुतीची सत्ता स्थापन झाल्यानंतर पालकमंत्रीपदाची घोषणा झाली आणि नाशिक जिल्ह्याच्या पालकमंत्रीपदी भाजपचे जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांची नियुक्ती झाली. मात्र उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नाराजीमुळे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पालकमंत्रीपदाला 12 तासात स्थगिती दिली. आणि राजकारणात उलट-सुलट चर्चेला सुरवात झाली.याला कारण देखील तसेच आहे. सुरवातीच्या काळात महायुतीत पालकमंत्रीपदावरून कुरबुरी सुरू असतानाच यावेळी पालकमंत्री वाटपाच्या वेळी वेगळीच गोष्ट पहायला मिळाली ती म्हणजे पहिल्यांदाच एका जिल्ह्याला दोन पालकमंत्री मिळाले आहेत.मुंबई आणि कोल्हापूरला यावेळी पालकमंत्र्यांनसोबत सहपालकमंत्री नियुक्त करण्यात आले आहेत. नेमके सहपालकमंत्र्यांना अधिकार काय असतात ? अथवा हे पद संविधानिक असते का ? यावर अजून स्पष्टता नाही. मात्र हा नवीन प्रयोग असल्याचे महायुतीचे नेते सांगत आहेत. कोल्हापूर जिल्ह्यात पहिल्यांदाच दोन पालकमंत्री नेमण्यात आले आहेत. शिंदे गटाच्या शिवसेनेचे प्रकाश आबिटकर पालकमंत्री, तर भाजपच्या माधुरी मिसाळ या सहपालकमंत्री म्हणून आता जिल्ह्याचा कारभार पाहणार आहेत.तर मुंबई उपनगरात भाजपचे अँड आशिष शेलार हे पालकमंत्री असणार तर सहपालकमंत्री मंगलप्रभात लोढा यांना करण्यात आले. काही दिवसांत महापालिका निवडणूका लागण्याची शक्यता बघता भाजपाने ही चाल खेळली असण्याची शक्यता असून मुख्यमंत्रीपदानंतर उपमुख्यमंत्रीपदी एकनाथ शिंदे विराजमान झाले आणि शिंदे गटाच्या कार्यकर्त्यांमध्ये चलबिचल सुरू झाली ती थांबविण्यासाठी व आगामी महापालिका निवडणुका व नाशिक शहरातील कुंभमेळा बघता उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर दबाव गट बनवत दादा भुसे यांना सहपालकमंत्री बनवण्याची शक्यता असून असे झाल्यास नाशिक जिल्ह्याला दोन पालकमंत्री मिळू शकतात गिरीश महाजन हे पालकमंत्री तर दादा भुसे हे सहपालकमंत्री असू शकतात यावर येत्या दोन दिवसात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस निर्णय घेणार असल्याची चर्चा आहे. असे झाल्यास पहिल्यांदाच नाशिक जिल्ह्याला दोन पालकमंत्री मिळतील.

Loading

Previous Post

…स्थगिती,तरीही ध्वजारोहण महाजन यांच्या हस्ते

Next Post

वडाळा परिसरात तरसांची दहशत

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Search

No Result
View All Result
  • About
  • advertise
  • Privacy & Policy
  • Contact Us

© 2024 Black & White

No Result
View All Result
  • Home
  • महाराष्ट्र
  • देशविदेश
  • क्रीडा
  • राजकीय
  • विविध
  • शेअर बाजार
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • संपादकीय

© 2024 Black & White