नाशिकच्या पालकमंत्रीपदाचा तिढा कायम

नाशिक : मुख्यमंत्रीपदाच्या रस्सीखेचानंतर आता महायुतीत पालकमंत्रीपदाची रस्सीखेच सुरू असून पालकमंत्रीपदी नेमणूक झाल्यानंतर गिरीश महाजन यांच्या पालकमंत्रीपदावर अवघ्या 24 तासात स्थगिती आल्याने लोकसभेनंतर पुन्हा एकदा पालकमंत्री स्थगिती पर्यंत नाशिक राज्याच्या राजकारणाच्या केंद्रस्थानी आले. सुरवातीच्या काळात मंत्रिमंडळापासून छगन भुजबळ यांना लांब ठेवत अजित पवार गटाच्या राष्ट्रवादीने धक्का दिला तर आता राज्यातील राजकारणात महत्वाची भूमिका बजावणारे संकटमोचक असलेले मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निकटवर्तीय व सिहस्थ कुंभमेळाचा अनुभव लक्षात घेता महाजन यांना पालकमंत्री पद दिले गेले. मात्र ते देखील 24 तासात स्थगिती झाले. तर इकडे राष्ट्रवादीचे जास्त आमदार म्हणून पालकमंत्रीपद आम्हालाच हवे तर दादा भुसे यांना ज्येष्ठत्वावर मंत्रीपद दयावे अशी मागणी भाजपच्या मित्रपक्षांनमध्ये वाढू लागली. यादरम्यान काल मुंबईत होणाऱ्या घडामोडीनकडे जिल्ह्याचे लक्ष लागून होते. तर इकडे नाशिकमध्ये प्रजासत्ताकदिनी गिरीश महाजन यांच्या हस्तेच ध्वजारोहण होणार आहे. याबाबत शासनाने स्वतंत्र आदेश जारी केला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस “दाओस” येथून परतल्यानंतरच पालकमंत्री पदाचा तिढा सुटणार असून कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर भाजप आपले पालकमंत्रीपद सहज हातचे जाऊ देईल असे वाटत नसून यातून मार्ग काढत पालकमंत्रीपदी पुन्हा एकदा गिरीश महाजन यांची नियुक्ती होण्याची शक्यता राजकीय क्षेत्रात व्यक्त करण्यात येत आहे.

![]()












