माजी नगरसेवकासह 11 जणांविरोधात खंडणीचा गुन्हा दाखल

नाशिक : जमिनीवर बळजबरीने कब्जा करण्याचा प्रयत्न करत पाच कोटींची खंडणी मागितल्या प्रकरणी इंदिरानगर पोलिसांनी माजी नगरसेवकासह अकरा जणांविरुद्ध खंडणीचा गुन्हा दाखल केल्याने खळबळ उडाली आहे. मिळालेल्या माहितीनुसार मुंबई येथे राहणाऱ्या फिर्यादी लीना प्रकाश लुल्ला यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार राणेंनगर परिसरात 2,112 चौ. मीटर इतके क्षेत्र खरेदी करून घेतले आहे. या जमिनीभोवती दगडी संरक्षक भिंत बांधण्यात आलेली आहे लीना यांचे दीर संशयित गुण उर्फ राजू लक्ष्मीचंद लुल्ला यांनी काही व्यक्तींची संगमत करून वही वाटेतील या जागेच्या व्यवहाराची विसार पावती हेमंत चव्हाण व किरण वाळके यांच्या नावे 2022 साली लिहून दिली होती. या प्रकरणी फसवणूक केल्याने फिर्यादीने त्यांच्या विरोधात दिवाणी न्यायालयात दावा दाखल केला आहे. लीना लुल्ला यांचे पती प्रकाश लुल्ला यांनी या मिळकतीबाबत कोणालाही कोणत्याही प्रकारे दस्तऐवज लिहून दिलेले नाही. असे फिर्यादीत म्हटले आहे यावर्षी सहा ऑगस्ट रोजी लुल्ला यांनी राणे नगर येथील जागेला गेले असता यावेळी तेथे संशयित हेमंत चव्हाण, किरण वाळके, शकील अहमद, माजी नगरसेवक पवन पवार, प्रवीण बेंच, सुभाष तमखाने, यांनी संगमताने या जागेवर जाहीर नोटीस लावण्याचा प्रयत्न केला तसेच संरक्षक भिंतीचे नुकसान करून तेथे जुना कंटनेर आणून उभा केला. या ठिकाणी दहा ते बारा गुंडांनी फिर्यादी प्रकाश लुल्ला यांना धमकावत पाच कोटी रुपये अदा करा मगच जागेवर या परत येथे आल्यास मुडदे पाडू असे धमकावल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. या प्रकरणाची इंदिरानगर पोलिसांनी गंभीर दखल घेतली असून संशयित आरोपी गुल उर्फ राजू लुल्ला, हेमंत चव्हाण, किरण वाळके, शकील अहमद, पवन पवार, विशाल पवार, प्रवीण बेंच, सुभाष तमखाने, पवन जाधव, सचिन बच्छाव, सतीश भालेराव अशा अकरा जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार हे सर्व संशयित घटनेच्या दिवसापासून फरार झाले आहेत गुन्हे शोध पथक त्यांच्या मागावर असून लवकरच संशय त्यांना ताब्यात घेतले जाईल.

![]()












