रस्त्यावर लढाई लढायला तयार भुजबळांचा एल्गार

नाशिक : राज्यात बहुमताने महायुतीचे सरकार आले त्यानंतर मंत्रिमंडळ विस्तार झाला मात्र या मंत्रिमंडळातून अनेक दिगग्ज नेत्यांना डावलण्यात आल्याने नाराजीचे फटाके फुटण्यास सुरवात झाली आहे. यामध्ये राष्ट्रवादीचे ‘दबंग” व जेष्ठ नेते छगन भुजबळ यांना मंत्रिमंडळात स्थान न दिल्याने त्यांनी जाहीर नाराजी बोलून दाखवली व आक्रमकपणे अजित पवार यांच्यावर टीका करत “जहां नहीं चैना, वहां नहीं रहना” म्हणत राष्ट्रवादीच्या अजित पवार गटाची झोप उडवून दिली. यादरम्यान आज झालेल्या मेळाव्यात छगन भुजबळ यांनी रस्त्यावर उतरून लढाईला तयार असल्याचे विधान केले आहे.आता लढाई आमदार म्हणून लढणार. तिथे कितीही बंधन असली तरी रास्ता तो मेरा है असंही छगन भुजबळ म्हणाले. ते पुढे म्हणाले मी संपूर्ण राज्यात जाणार. एवढंच नाही तर अनेक राज्यांराज्यात जाणार. पुन्हा ओबीसीचा एल्गार करणार. दिल्लीत रामलिला मैदान भरवलेलं सगळ्यांनी बघितलं होतं. पाटणा, बिहारमध्ये पाऊस पडला तरी लोक बसले होते. इंदिरा गांधी, जयप्रकाश नारायण यांच्या सभांच्या नंतर समता परिषदेची सभा इतकी मोठी झाली. पूर्ण मैदान भरलं होतं. काहींचं आपल्याबद्दल वेगळं मत निर्माण झालं आहे. त्यांना मी इतकंच सांगू इच्छितो, ‘मेरे बारे मे कोई राय मत बनाना गालिब.. एक ऐसा दौर आयेगा मेरा वक्त भी बदलेगा और तेरी राय भी बदलेगी.’ असाही शेर छगन भुजबळ यांनी म्हटला आहे.मंत्रिपद मिळालं नाही तर नाही मात्र अवहेलनचं शल्य मनात आहे. मी तुम्हा सगळ्यांशी चर्चा करुन पुढचं पाऊल उचलणार आहे. विचारपूर्वक निर्णय घेणार. मै मौसम नहीं जो पल में बदल जाऊं, मै उस पुराने जमाने का सिक्का हूँ, ऐसेही फेक न देना हो सकता है बुरे दिनों में मैं ही चल जाऊँ”, असाही शेर छगन भुजबळ यांनी म्हटला. तसंच ते पुढे म्हणाले की प्रश्न माझ्या मंत्रिपदाचा नाही, ओबीसी समाजाचे प्रश्न निर्माण होतील तेव्हा संरक्षणाची ढाल कोण उभी करणार? मंत्रिपद आलंही आणि गेलंही एवढंच काय विरोधी पक्षनेता म्हणूनही मी काम केलं आहे, असेही भुजबळ म्हणाले.महायुतीच्या सरकारला ओबीसींची एकगट्टा मते मिळाल्याची आठवण भुजबळ यांनी या मेळाव्यात करुन दिली आहे. विधानसभेच्या निवडणूका झाल्या परंतू राज्यातील महानगर पालिका, नगर पालिका, नगर परिषद यांच्या निवडणूका अजून बाकी असल्याचे म्हणत छगन भुजबळ यांनी आपले उपद्रव्य मूल्य दाखविण्यास सुरुवात केली आहे.

![]()












