मनी लॉन्ड्रिंगची भीती दाखवत तब्बल 23 लाखांची लूट

नाशिक : सध्या कुणाला कॉल लावत असताना आधी हिंदीतून एक संदेश ऐकू येतो, सावधान अनोळखी कॉल वरून पोलीस, ईडी, सीबीआय, सीआयडी, कस्टम या नावाने कॉल आल्यास घाबरू नका राष्ट्रीय सायबर सेलकडे तक्रार करा मात्र आपण या संदेशाकडे दुर्लक्ष करतो याकडे दुर्लक्ष करणे महागात पडू शकते ते या घटनेवरून दिसून येते असाच काहीसा फसवणुकीचा प्रकार नाशिक शहरात घडला असून शहरातील नोकरदारासोबत अशाचप्रकारे सायबर गुन्हेगारांनी आपण ‘अंधेरी सायबर सेलचे’ अधिकारी असल्याचे भासवून आपला मनी लॉन्ड्रीग मध्ये सहभाग असून ‘डिजिटल अरेस्ट’ चा धाक दाखवत 23 लाख 50 हजार रुपयांना गंडा घातला. दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की मोबाईलवर तसेच स्काइप आयडीद्वारे संपर्क साधत चॅटिंग करून तुमच्या खात्यात जमा असलेली रक्कम फंड व्हेरिफिकेशनकरिता आम्ही सांगितल्याप्रमाणे बँक खात्यात वर्ग करावे असे सांगून ऑनलाईन गंडा घातल्याचे तक्रारीत म्हटले आहे. तक्रारदाराच्या विनंतीवरून सायबर पोलिसांनी नाव गुप्त ठेवले आहे. सध्या सायबर गुन्हेगारांनी शासकीय तपासी यंत्रणांच्या नावाचा वापर सुरू केला असून नागरिकांना शासकीय यंत्रणेची भीती घालत डिजिटल अरेस्ट, डिजिटल डिटेन्शन असे शब्दप्रयोग करीत अटकेच्या कारवाईची भीती दाखवून गंडा घालण्याचा प्रकार सुरू केला असून नागरिकांनी घाबरून न जाता सायबर पोलिसांबरोबर संपर्क साधावा

![]()












