आदिवासी विकास मंत्रिपद मिळण्याची शक्यता

नाशिक : होणाऱ्या मंत्र्यांना खुद्द मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे फोन करणार असल्याने सर्वच आमदारांचे लक्ष कालपासून आपल्या फोनकडे लागून होते त्यानुसार नाशिक जिल्ह्यात अजित पवार गटाच्या राष्ट्रवादीच्या आमदाराला मंत्रिपदासाठी पहिला फोन आल्याचे समजते आहे.मिळालेल्या माहितीनुसार राष्ट्रवादी कॉग्रेसचे दिंडोरीचे आमदार नरहरी झिरवळ यांचे नाव मंत्रिपदासाठी निश्चित झाले आहे. नरहरी झिरवळ यांना प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी मंत्रीपदाच्या शपथविधीसाठी फोन केल्याची माहिती मिळते आहे.नरहरी झिरवाळ हे 2019- 2024 या काळात महाराष्ट्राच्या विधानसभेचे उपाध्यक्ष होते. नाशिक हे महसूल विभागाचे केंद्र समजले जाते. नाशिक मध्ये आदिवासी विकास आयुक्तालय, शबरी विकास महामंडळ ही महत्त्वाची मुख्यालये आहेत. त्यामुळे आदिवासी विकास मंत्रिपद यंदा नाशिकलाच देण्यात यावे यासाठी मोठ्या हालचाली सुरू होत्या. यासाठी राष्ट्रवादी आणि भाजप दोघेही पक्ष आघाडीवर होते. राष्ट्रवादीकडे(अजित पवार गट) तीन आदिवासी आमदार आहेत नरहरी झिरवाळ, हिरामण खोसकर, नितीन पवार तर भाजपकडे दिलीप बोरसे मात्र आदिवासी विकास मंत्रिपद अजित पवारांच्या राष्ट्रवादीकडे जाण्याची शक्यता दिसत असून त्या मंत्रीपदावर नरहरी झिरवळ यांची वर्णी लागणार असल्याचे कळते आहे.त्याचबरोबर राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ यांचे देखील नाव मंत्रिपदासाठी निश्चित झाल्याची माहिती मिळत आहे. आहेत तरी कोण नरहरी झिरवाळ ?नरहरी झिरवाळ हे राष्ट्रवादी काँग्रेसचे दिंडोरीचे आमदार आहेत. 1999 ते 2024, 2009 ते 2014, 2019-2024 या तीन टर्ममध्ये आमदार होते. आता ते चौथ्यांदा पुन्हा निवडून आले आहेत. महाविकास आघाडी आणि महायुती सरकारच्या काळात राज्याच्या विधानसभेचे उपाध्यक्ष होते. नाना पटोले यांनी अध्यक्षपदाचा राजीनामा दिल्यानंतर नरहरी झिरवाळ यांनी विधानसभा अध्यक्षपदाचा कार्यभार सांभाळला होता.

![]()












