जुन्या चेहऱ्यांबरोबर नवीन चेहरे देखील असणार मंत्रिमंडळात

नाशिक : महायुती सरकारमधील मंत्र्यांचा शपथविधी आज नागपूरमध्ये दुपारी 4 वाजेच्या दरम्यान पार पडणार असून राज्य मंत्रिमंडळाच्या विस्तारात 39 मंत्री आज शपथ घेणार आहेत .मंत्रिमंडळात भाजपचे 21 शिवसेनेचे 12 तर राष्ट्रवादीचे 10 मंत्री असणार आहेत. त्यापैकी मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांनी शपथ घेतलीय. त्यामुळे आता भाजपचे 20, शिवसेनेचे 11 तर राष्ट्रवादीचे 9 आमदार आज मंत्रिपदाची शपथ घेणार असल्याची माहिती आहे. यामध्ये भाजपकडून या आमदारांना आले फोन— नितेश राणे शिवेंद्रराजे भोसले,चंद्रकांत पाटील, पंकज भोयर, मंगलप्रभात लोढा,गिरीश महाजन, जयकुमार रावल, पंकजा मुंडे, राधाकृष्ण विखे पाटील, गणेश नाईक, मेघना बोर्डीकर, अतुल सावे, जयकुमार गोरे, माधुरी मिसाळ, चंद्रशेखर बावनकुळे,संजय सावकारे, अशोक उईके, आकाश फुंडकर, आशिष शेलार तर शिंदे गटाच्या शिवसेनेकडून या आमदारांना आले फोन —उदय सांमत,प्रताप सरनाईक, शंभूराज देसाई, योगेश कदम, आशिष जयस्वाल, भरत गोगावले, प्रकाश आंबिकर, दादा भुसे, गुलाबराव पाटील, संजय राठोड, संजय शिरसाट, तर अजित पवार गटाच्या राष्ट्रवादीकडून या आमदारांना आले फोन— अदिती तटकरे, बाबासाहेब पाटील, दत्ता भरणे, हसन मुश्रीफ, नरहरी झिरवळ, मकरंद पाटील, इंद्रनील नाईक

![]()












