• Latest
  • Trending
मतदानाआधी नाशकात सापडले कोटींचे घबाड

मतदानाआधी नाशकात सापडले कोटींचे घबाड

November 19, 2024
शुद्ध हवा विसरा… नाशिकची  हवा ‘अस्वस्थ’ करणारी

शुद्ध हवा विसरा… नाशिकची हवा ‘अस्वस्थ’ करणारी

October 16, 2026
त्र्यंबकेश्वरमध्ये 31 फूट सिंहस्थ ध्वजस्तंभाचे पूजन

त्र्यंबकेश्वरमध्ये 31 फूट सिंहस्थ ध्वजस्तंभाचे पूजन

October 15, 2026
पक्षासाठी लढणाऱ्या कार्यकर्त्यांना कधी मिळणार पदे ?

पक्षासाठी लढणाऱ्या कार्यकर्त्यांना कधी मिळणार पदे ?

October 15, 2026
नासिक मध्ये दोन कोटींचा रुग्ण घोटाळा तीन हॉस्पिटल्स वर गुन्हा दाखल

नासिक मध्ये दोन कोटींचा रुग्ण घोटाळा तीन हॉस्पिटल्स वर गुन्हा दाखल

October 14, 2026
जिनिव्हाच्या जागतिक मंचावर घुमला नाशिकच्या महापौरांचा आवाज

जिनिव्हाच्या जागतिक मंचावर घुमला नाशिकच्या महापौरांचा आवाज

October 13, 2026
नाशकात शिंदे गटाच्या नेत्यावर कोयत्याने हल्ला

कायद्याच्या बालेकिल्ल्यात तरुणांवर कोयत्याने आणि पेवर ब्लॉक ने हल्ला

October 13, 2026
नाशिकच्या कार्यक्रमात मुख्यमंत्री पोलिसांवर नाराज…

नाशिकच्या कार्यक्रमात मुख्यमंत्री पोलिसांवर नाराज…

October 11, 2026
नाशिक आणि त्र्यंबकेश्वरचा  कायापालट होणार-मुख्यमंत्री

नाशिक आणि त्र्यंबकेश्वरचा कायापालट होणार-मुख्यमंत्री

October 11, 2026
भविष्यात गणेश आणि नवरात्र उत्सव मंडळांची संख्या कमी होण्याची शक्यता ?

भविष्यात गणेश आणि नवरात्र उत्सव मंडळांची संख्या कमी होण्याची शक्यता ?

October 11, 2026
नाशिकच्या खड्ड्यांनी घेतला तेरावा बळी; नातेवाईकांचा आरोप

नाशिकच्या खड्ड्यांनी घेतला तेरावा बळी; नातेवाईकांचा आरोप

October 9, 2026
‘नटसम्राट’ची एक्झिट! ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांचे निधन

‘नटसम्राट’ची एक्झिट! ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांचे निधन

October 8, 2026
महापालिकेत “उद्यान” घोटाळा

महापालिकेत “उद्यान” घोटाळा

October 7, 2026
News Black & White
Sunday, October 18, 2026
  • Home
  • महाराष्ट्र
  • देशविदेश
  • क्रीडा
  • राजकीय
  • विविध
  • शेअर बाजार
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • संपादकीय
No Result
View All Result
News Black & White
No Result
View All Result

मतदानाआधी नाशकात सापडले कोटींचे घबाड

YOU MAY ALSO LIKE

अखेर नगरसेवक प्रविण तिदमे यांची नाराजी दूर

नासिकमध्ये महिला नेत्याने उमेदवारी अर्ज मागे घेतला आणि…….

पैसे ठाण्यातील उद्योजकाचे, प्रकरण आयकर विभागाकडे

नाशिक: विधानसभेच्या निवडणुकीला अवघे काही तास शिल्लक राहिले असताना जिल्ह्यात विविध ठिकाणी मोठी कारवाई करण्यात येत असून त्यात रोख रक्कम, दारू, महागडे धातू, अशा विविध वस्तू जप्त करण्यात येत आहे. यासाठी ऑनलाईन ॲप्स, दूरध्वनीवरही तक्रारी प्राप्त होत आहेत. सोमवारी सकाळच्या सुमारास पाथर्डी फाटा येथील एका नामांकित हॉटेलमध्ये थांबलेल्या जयंत साठे यांच्याकडे मोठ्या प्रमाणावर रोख रक्कम असल्याची माहिती नाशिक पश्चिम मतदार संघाच्या सहाय्यक निवडणूक अधिकारी सुनीता कुमावत यांना माहिती मिळाली.   त्यानंतर त्याची खात्री करण्यासाठी निवडणूक विभागाने भरारी पथकासह हॉटेलमध्ये छापा टाकल्यानंतर त्यात सत्यता आढळून आली. रूममध्ये पहाणी केली असता तेथे जयंत साठे नामक व्यक्ती मुक्कामी असल्याचे निदर्शनास आले. भरारी पथकास येथे 1 कोटी 98 लाख रुपये मिळून आले. ही रक्कम आपण का बाळगत आहात याची विचारपूस केली असता साठे यांनी आपण उद्योजक असून व्यावसायिक कामकाजासाठी रक्कम आणल्याचे भरारी पथकास सांगितले. मात्र त्यासाठी ठोस कारण न दिल्याने ही रक्कम निवडणूक आयोगाच्या कोषागार मध्ये जमा करण्यात आली. ही कारवाई सहाय्यक खर्च निरीक्षक दीपक गवळी यांच्या उपस्थित करण्यात आली. या कारवाईत भरारी पथकाचे वाय पी बिन्नर, दिलीप सूर्यवंशी, निलेश वाघ वैजनाथ झुंगे, पोलीस हवालदार सुधाकर आव्हाड, कॉन्स्टेबल प्रकाश नागरे, यांनी सहभाग घेतला या संपूर्ण कारवाईचे व्हिडिओ चित्रकारण करण्यात आले आहे जिल्हा निवडणूक अधिकारी जलद शर्मा यांच्या  मार्गदर्शनानुसार 125 नाशिक विधानसभा मतदारसंघाच्या निवडणूक निर्णय अधिकारी श्रीमती शुभांगी भारदे यांच्या नियंत्रणाखाली पूर्ण करण्यात आली. कशी होती रक्कम एका बॅगेत 500, 200 आणि 100 रुपयांच्या 97 लाख 90 हजार रुपयांच्या नोटा आढळल्या. तर दुसऱ्या बॅगेत पाचशे रुपयांच्या नोटाचे 195 बंडल आढळले. त्यात 97 लाख 50 हजार रुपये होते. टेबलच्या ड्रॉवरमध्ये दोन लाख 60 हजार रुपये सापडले यात एकूण 1 कोटी 98 लाख रुपयांची रोख रक्कम पथकास मिळून आली.

Loading

Previous Post

“पूर्व” मध्ये दुसऱ्यांदा राजकीय राडा

Next Post

पोलीस प्रशासनाची तयारी पूर्ण,आता मतदार राजाची जबाबदारी

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Search

No Result
View All Result
  • About
  • advertise
  • Privacy & Policy
  • Contact Us

© 2024 Black & White

No Result
View All Result
  • Home
  • महाराष्ट्र
  • देशविदेश
  • क्रीडा
  • राजकीय
  • विविध
  • शेअर बाजार
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • संपादकीय

© 2024 Black & White