कडेकोट सुरक्षाव्यवस्था, सशस्र कमांडो

नाशिक : लोकसभा निवडणुकीपाठोपाठ विधानसभा निवडणुकीची मतदान प्रक्रिया देखील शांततेत पार पडावी यासाठी नासिक पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांच्या मार्गदर्शनाखाली प्रशासनाकडून सर्वतोपरी खबरदारी घेत बंदोबस्ताचे सूक्ष्म नियोजन करण्यात आले आहे. नासिक पूर्व पश्चिम, मध्य व देवळाली मतदारसंघाचा काही भाग आयुक्तालयाच्या हद्दीत समाविष्ट होतो. मतदानाच्या दिवशी सर्व मतदार संघात मतदानाची प्रक्रिया शांततेत व सुलभपणे पार पडावी कुठे कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये. यासाठी पोलीस आयुक्तालाकडून अचूक नियोजन करण्यात आले आहे. बंदोबस्ताचा आराखडा देखील तयार करण्यात आला आहे. शहर पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीत सुमारे 129 बुत असून त्यावर बुधवारी मतदारांकडून मतदान केले जाणार आहे. या बुतनिहाय बंदोबस्ताकरिता एकूण 984 पोलीस अंमलदार 864 होमगार्ड सह सहस्त्र कमांडो तैनात राहणार आहेत. तसेच मतदान केंद्राच्या शंभर मीटर परिसरासाठी एकूण 66 पोलीस अधिकारी १३१ अंमलदार होमगार्ड व तीन जलद प्रतिसाद पथके अलर्ट वर राहणार आहेत . पोलीस आयुक्तांसह चार पोलीस उपायुक्त सात सहाय्यक पोलीस आयुक्तांसोबत प्रत्येकी एक ट्रेकिंग पोलीस फोर्स राहणार आहेत. हे सर्व अधिकारी मतदारसंघांमध्ये गस्तीवर राहणार आहेत. त्याचबरोबर केंद्रीय सहस्त्र पोलीस दलाच्या अर्ध सैनिक बलाच्या जवानांचे 25 सेक्शन महत्त्वाच्या 39 ठिकाणांवर तैनात करण्यात येणार आहे. यामध्ये अत्याधुनिक रायफलधारी कमांडोंचा समावेश आहे तसेच या सहस्त्र कमांडोंची सात फिरती पथके मतदानाच्या दिवशी सक्रिय राहणार आहेत. भरारी पथकांसह सर्व पोलीस ठाण्यांचे पीटर मोबाईल, सीआर मोबाईल वाहने तसेच पोलीस उपायुक्त सहाय्यक पोलीस आयुक्तांची स्ट्राइकिंग फोर्स सह संपूर्ण चारही मतदारसंघ निहाय गस्त मतदानाच्या दिवशी राहणार आहे. पोलीस नियंत्रण कक्षाकडून सर्व पोलीस ठाण्यांचा सर्व अधिकाऱ्यांच्या वाहनांसोबत वायरलेस यंत्रणेद्वारे संपर्क ठेवला जाणार आहे.
![]()












