नांदगाव मतदारसंघात आ. सुहास कांदे व मा .खा. समीर भुजबळ यांच्यात राडा

नाशिक : महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकीचे मतदान शांततेत पार पडत असताना आज नांदगाव मतदारसंघात तणावपूर्ण वातावरण निर्माण झाले होते. या मतदारसंघात शिंदे गटाच्या शिवसेनेकडून सुहास कांदे हे उमेदवार असून त्यांच्या समोर अपक्ष उमेदवार माजी खासदार समीर भुजबळ हे आहेत. या दोन्ही उमेदवारांमध्ये आज जोरदार राडा झाला. मिळालेल्या माहितीनुसार सुहास कांदे यांनी बोलविलेल्या मतदारांना समीर भुजबळ यांनी अडवले.समीर भुजबळांनी मतदारांनी भरलेल्या बस समोर गाड्या आडव्या लावत यांची चौकशी झाल्याशिवाय बसपुढे जाऊ देणार नाही असा पवित्रा घेतला यानंतर भुजबळ-कांदे समर्थक आमने-सामने आल्यानंतर बाचाबाची सुरू झाली. यानंतर समीर भुजबळ व सुहास कांदे हे देखील आमने-सामने आले. यादरम्यान झालेल्या बाचाबाचीत आज तुझा मर्डर फिक्स आहे.असे म्हणत सुहास कांदे यांनी समीर भुजबळ यांना थेट मारून टाकण्याची धमकी दिली मुख्य म्हणजे ही धमकी पोलिसांसमोर दिल्याने नांदगाव मतदारसंघात खळबळ उडाली आहे. नांदगाव-मनमाड रस्त्यावर हा सर्व प्रकार घडला.


![]()












