ढिकले व गीते समर्थक पुन्हा भिडले, पैसे वाटपाचा आरोप

नाशिक : नाशिक पूर्व मतदारसंघात पुन्हा एकदा राडा होऊन ढिकले समर्थक आणि गीते समर्थक एकमेकांना भिडल्यामुळे काही काळ तणाव निर्माण झाला होता. मिळालेल्या माहितीनुसार पंचवटीतील चार हत्ती पुलालगत असलेल्या वेताळ बाबा मंदिराजवळ एका माजी नगरसेवकाच्या बंगल्यात उमेदवाराद्वारे पुरविण्यात आलेल्या रकमेतून पैसे वाटप होत असल्याचा संशय प्रतिस्पर्धी उमेदवारांच्या कार्यकर्त्यांनी घेतला यादरम्यान महाविकास आघाडी व महायुतीचे कार्यकर्ते रात्री समोरा-समोर भिडले. यावेळी झालेल्या दगडफेकीत दोन मोटारीचे नुकसान झाले. पोलिसांनी धाव घेत परिस्थितीवर नियंत्रण मिळविले. काही दिवसांपूर्वी देखील हिरावाडी परिसरात वाहनावर दगडफेक करण्यात येऊन पैसे वाटपाचा आरोप करण्यात आला होता. दुसऱ्यांदा झालेला राजकीय राडा बघता पोलिसांचा मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.


![]()












