• Latest
  • Trending
नाशकात पुन्हा राडा,ठाकरे गट व भाजप आमने-सामने

नाशकात पुन्हा राडा,ठाकरे गट व भाजप आमने-सामने

November 15, 2024
शुद्ध हवा विसरा… नाशिकची  हवा ‘अस्वस्थ’ करणारी

शुद्ध हवा विसरा… नाशिकची हवा ‘अस्वस्थ’ करणारी

October 16, 2026
त्र्यंबकेश्वरमध्ये 31 फूट सिंहस्थ ध्वजस्तंभाचे पूजन

त्र्यंबकेश्वरमध्ये 31 फूट सिंहस्थ ध्वजस्तंभाचे पूजन

October 15, 2026
पक्षासाठी लढणाऱ्या कार्यकर्त्यांना कधी मिळणार पदे ?

पक्षासाठी लढणाऱ्या कार्यकर्त्यांना कधी मिळणार पदे ?

October 15, 2026
नासिक मध्ये दोन कोटींचा रुग्ण घोटाळा तीन हॉस्पिटल्स वर गुन्हा दाखल

नासिक मध्ये दोन कोटींचा रुग्ण घोटाळा तीन हॉस्पिटल्स वर गुन्हा दाखल

October 14, 2026
जिनिव्हाच्या जागतिक मंचावर घुमला नाशिकच्या महापौरांचा आवाज

जिनिव्हाच्या जागतिक मंचावर घुमला नाशिकच्या महापौरांचा आवाज

October 13, 2026
नाशकात शिंदे गटाच्या नेत्यावर कोयत्याने हल्ला

कायद्याच्या बालेकिल्ल्यात तरुणांवर कोयत्याने आणि पेवर ब्लॉक ने हल्ला

October 13, 2026
नाशिकच्या कार्यक्रमात मुख्यमंत्री पोलिसांवर नाराज…

नाशिकच्या कार्यक्रमात मुख्यमंत्री पोलिसांवर नाराज…

October 11, 2026
नाशिक आणि त्र्यंबकेश्वरचा  कायापालट होणार-मुख्यमंत्री

नाशिक आणि त्र्यंबकेश्वरचा कायापालट होणार-मुख्यमंत्री

October 11, 2026
भविष्यात गणेश आणि नवरात्र उत्सव मंडळांची संख्या कमी होण्याची शक्यता ?

भविष्यात गणेश आणि नवरात्र उत्सव मंडळांची संख्या कमी होण्याची शक्यता ?

October 11, 2026
नाशिकच्या खड्ड्यांनी घेतला तेरावा बळी; नातेवाईकांचा आरोप

नाशिकच्या खड्ड्यांनी घेतला तेरावा बळी; नातेवाईकांचा आरोप

October 9, 2026
‘नटसम्राट’ची एक्झिट! ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांचे निधन

‘नटसम्राट’ची एक्झिट! ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांचे निधन

October 8, 2026
महापालिकेत “उद्यान” घोटाळा

महापालिकेत “उद्यान” घोटाळा

October 7, 2026
News Black & White
Sunday, October 18, 2026
  • Home
  • महाराष्ट्र
  • देशविदेश
  • क्रीडा
  • राजकीय
  • विविध
  • शेअर बाजार
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • संपादकीय
No Result
View All Result
News Black & White
No Result
View All Result

नाशकात पुन्हा राडा,ठाकरे गट व भाजप आमने-सामने

YOU MAY ALSO LIKE

अखेर नगरसेवक प्रविण तिदमे यांची नाराजी दूर

नासिकमध्ये महिला नेत्याने उमेदवारी अर्ज मागे घेतला आणि…….

नाशिकचे राजकीय वातावरण तापले .भाजप नेत्या पंकजा मुंडे अंबड पोलीस ठाण्यात दाखल

नाशिक : विधानसभेची निवडणूक अंतिम टप्यात असताना नाशिक शहरातील राजकीय पक्षांचे कार्यकर्ते आमने-सामने येत असल्यामुळे वातावरण तणावपूर्ण होत आहे. काल नाशिक पूर्व मतदारसंघात शरद पवार गटाच्या राष्ट्रवादी आणि भाजपचे कार्यकर्ते आमने-सामने येऊन मोठा राडा झाला होता. यावेळी पूर्व चे महाविकास आघाडीचे उमेदवार गणेश गीते यांचे कार्यकर्ते पैसे वाटप करत असल्याचा आरोप भाजप कार्यकर्त्यांनी केला होता. तर भाजप कार्यकर्त्यांनी राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या गाड्यांवर हल्ला केला. असल्याचा आरोप केला होता यादरम्यान खा. सुप्रिया सुळे यादेखील आक्रमक झाल्या होत्या तसाच काहीसा प्रकार आज नाशिक पश्चिम मतदारसंघात घडला.पश्चिम मतदारसंघात भाजप महायुतीच्या सीमा हिरे या उमेदवार असून ठाकरे गटाच्या शिवसेनेकडून म्हणजेच महाविकास आघाडीचे उमेदवार सुधाकर बडगुजर आहेत तर मनसेच्या वतीने दिनकर पाटील हे उमेदवारी करत आहेत. या मतदारसंघात आज
पैसे वाटप करत असल्याचा आरोप करत ठाकरे गटाच्या शिवसेनेचे कार्यकर्ते आणि भाजपचे कार्यकर्ते एकमेकांना भिडले.यामुळे सिडको परिसरात तणाव निर्माण झाला होता.भाजपाचे माजी नगरसेवक मुकेश शहाणे यांनी ठाकरे गटाच्या शिवसेनेचे उमेदवार सुधाकर बडगुजर यांच्यावर मारहाण आणि गोळीबार केल्याचा आरोप केला आहे. यावर पलटवार करत महाविकास आघाडीचे उमेदवार सुधाकर बडगुजर म्हणाले भाजपचे आरोप खोटारडे असून पैसे वाटण्याचा प्रकार होत होता तर समोर आणणे गरजेचं होते. ते गुंड घेऊन आले आणि बंदुकीने मारहाण केली. आमचीही मागणी आहे की दोषींवर कारवाई करावी मात्र सावता नगर परिसरात एकमेकांवर आरोप करत बाचाबाचीचे रूपांतर हाणामारीत झाले यामध्ये एक कार्यकर्ता जखमी झाल्याचे समजते.या घटनेनंतर  भाजप नेत्या पंकजा मुंडे आणि सीमा हिरे पोलीस ठाण्यात दाखल झाल्या. असून अंबड पोलीस ठाण्याच्या आवारात दोन्ही बाजूंचे समर्थकांनी गर्दी केली होती. गुंडगिरी खपवून घेणार नाही- आ .पंकजा मुंडे यावेळी प्रसारमाध्यमांशी बोलताना पंकजा मुंडे म्हणाल्या ही घटना गंभीर आहे. गुंडगिरी चालणार नाही. आमच्या कार्यकर्त्यांवर प्राणघातक हल्ला झाला, मी यावर पोलिसांना लक्ष घालण्याचे सांगितले आहे. याठिकाणी महिला उमेदवार निवडणुकीसाठी उभी असताना ही घटना घडली आहे. त्याचा मी जाहीर निषेध करते.  आमची निवडणूक विकासावर सुरू असल्याचे देखील मुंडे म्हणाल्या

Loading

Previous Post

बाईक रॅलीतून वसंत गितेंचे शक्तिप्रदर्शन

Next Post

नाशिक वाऱ्यावर सोडलं आणि गद्दारांना डोक्यावर घेतलं

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Search

No Result
View All Result
  • About
  • advertise
  • Privacy & Policy
  • Contact Us

© 2024 Black & White

No Result
View All Result
  • Home
  • महाराष्ट्र
  • देशविदेश
  • क्रीडा
  • राजकीय
  • विविध
  • शेअर बाजार
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • संपादकीय

© 2024 Black & White