ड्रग्जमुक्त, भयमुक्त, गुन्हेगारी मुक्त नाशिक करण्याचा निर्धार

नाशिक: मध्य नाशिक विधानसभा मतदारसंघातील महायुती व ठाकरे गटाच्या शिवसेनेचे उमेदवार वसंत गिते यांच्या प्रचारात शहरातील प्रमुख मार्गाने मोटरसायकल रॅली काढण्यात आली. याप्रसंगी रॅली मार्गावर नाशिककरांनी फुलांची उधळण फटाक्यांची आतिषबाजी तसेच महिला वर्गाने औक्षण करत वसंत गिते यांच्या विजयासाठी शुभेच्छा दिल्या. नाशिक शहर वाचवण्यासाठी भयमुक्त, ड्रग्जमुक्त, गुन्हेगारी मुक्त नाशिक या मोहिमेला बळ देण्याचा निर्धार नाशिककरांनी व्यक्त केला असून विकसित नाशिक करण्यासाठी युवकांनी मोठ्या प्रमाणात रॅलीत सहभाग नोंदवला. शिवसेनेच्या शालिमार चौकातील मुख्य प्रचार कार्यालयापासून मोटरसायकल रॅलीला सुरुवात झाली. या प्रसंगी खासदार राजाभाऊ वाजे, माजी महापौर विनायक पांडे, दत्ता गायकवाड, माजी आमदार नितीन भोसले, महानगर प्रमुख विलास शिंदे, बाळासाहेब कोकणे, सचिन मराठे, प्रथमेश गीते, श्याम कंगले, ऋतुराज पांडे, संजय चव्हाण, सिराज जैन, सुभाष नहार, ऋषी वर्मा भैया मणियार, सुभाष शेजवळ, विनायक खैरे, वैभव खैरे, बाळासाहेब पाठक, संपतराव जाधव, संजय परदेशी, रंगरेंज दस्तगीर, करण लोणारी, संदेश फुले, सचिन बंडे, राजेंद्र क्षीरसागर, विलास घोलप, गोरख वाघ, विनोद नूनसे, वामनराव तमखाने, व महाविकास आघाडीतील घटक पक्षांचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होती. ही रॅली शिवसेना कार्यालय नेहरू उद्यान, यशवंत व्यायाम शाळा, मेहेर सिग्नल, अशोक स्तंभ, रविवार कारंजा, मेनरोड, धुमाळ पॉइंट, नेहरू चौक, सोमवार पेठ साक्षी गणेश, वाकडी बारव, चौक मंडळी, काजीपुरा, बुधवार पेठ, छपरिची तालीम, नानावली, ट्रॅक्टर हाऊस टाकळी रोड, सावता माळी उद्यान, काठे गल्ली, भाभानगर, मार्गे मुंबई नाका येथे रॅलीचा समारोप झाला.


![]()












