त्या चौघांनी बनावट कॉल तयार करून केली दिशाभूल

नाशिक : विधानसभेची निवडणूक अंतिम टप्यात असताना आरोप-प्रत्यारोप सुरु आहेत .त्याचबरोबर नाशिकच्या पूर्व मतदारसंघात ढिकले-गिते समर्थकांमध्ये झालेल्या राड्यानंतर बनावट ऑडिओ क्लिप तयार करणाऱ्या चारजणांवर कारवाई करण्याची मागणी पूर्व मतदारसंघातील भाजपचे उमेदवार अँड राहुल ढिकले यांनी केली आहे. विधानसभा निवडणुकीसाठी अर्ज दाखल करण्याची मुदत संपल्यानंतर शरद पवार गटाच्या राष्ट्रवादीचे उमेदवार गणेश गिते यांनी पत्रकार परिषद घेतली . आणि त्यात या निवडणुकीत मतदारांमध्ये संभ्रम निर्माण करण्यासाठी आपल्या नावासारखा उमेदवार शोधण्यात आला त्यातील एकाला 20 लाख रुपयांचे आमिष दाखवले, असा आरोप करीत ऑडिओ क्लिप ऐकवली होती त्यावर अँड राहुल ढिकले यांनी या ऑडिओ क्लिपची फॉरेन्सिक लॅबद्वारे चौकशी करण्याची मागणी केली होती. त्यानुसार तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे ओंकार गोरे, वंजारी गल्ली सिन्नर, अनिकेत पाटील, योगेश नाईक, अनिल लहामगे या चौघांनी संबंधित कॉल केल्याचे समोर आले त्यामुळे त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची मागणी अँड राहुल ढिकले यांनी केली. या संदर्भात पोलीस आयुक्तांना पत्र देखील दिले आहे.


![]()












