देवळाली मतदारसंघात नेमका महायुतीचा उमेदवार कोण ?

नाशिक : विधासभा निवडणुकांचे बिगुल वाजल्यानंतर आता नाशिक जिल्ह्यात दिगग्ज नेत्यांच्या सभांचा धडाका सुरू होणार असून त्याची सुरवात आज देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सभेने होणार आहे. आज दुपारी तपोवन परिसरात पंतप्रधान मोदी यांची सभा आहे . मध्य नाशिक मतदारसंघाच्या उमेदवार देवयानी फरांदे, पूर्व मतदारसंघाचे उमेदवार राहुल ढिकले तर पश्चिम मतदारसंघाच्या उमेदवार सीमा हिरे हे भाजपचे अधिकृत उमेदवार असून हे तिघे उमेदवार पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या व्यासपीठावर असणार आहेत मात्र देवळाली मतदारसंघाचे काय ? या मतदारसंघात महायुती च्या वतीने अजित पवार गटाच्या राष्ट्रवादीच्या उमेदवार विद्यमान आमदार सरोज आहिरे असून याच मतदारसंघात काही दिवसांपूर्वी अर्ज भरण्याच्या काही तासांच्याआधी नाट्यमय घडामोडी होत हेलिकॉप्टर ने आलेला एबी फार्म डॉ राजश्री आहिरे यांच्या अर्जाला शिंदे गटाच्या शिवसेनेचा एबी फार्म जोडण्यात आला. त्यानंतर माघारीच्या दिवशी देखील मोठ्या घडामोडी झाल्या पक्षाचा माघारीचा आदेश असताना देखील डॉ राजश्री अहिरराव या गायब झाल्या होत्या त्यांचा मोबाईल नॉट रीचेबल येत होता. अखेर पक्षाने त्याची उमेदवारी मागे घेत असल्याचे पत्र दिले. मात्र त्याठिकाणी समोर उमेदवारच नसल्याने निवडणूक आयोगाने हे नियमात बसत नसल्याचे सांगत राजश्री अहिरराव यांची उमेदवारी व चिन्ह कायम ठेवले मात्र देवळाली मतदारसंघाच्या बाबतीत अजूनही शिंदे गटाच्या शिवसेनेत समभ्रम असून त्या शिंदे गटाच्या अधिकृत उमेदवार आहेत का ? या ठिकाणी अजित पवार गट, शिंदे गट यांच्यात मैत्रीपूर्ण लढत होणार का ? या प्रश्नांची उत्तरे मिळत नसल्याने कार्यकर्ते देखील समभ्रमात असून यावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे निर्णय घेणार असल्याचे समजते. मात्र आज पंतप्रधान मोदी यांच्या व्यासपीठावर नेमका महायुतीचा कोणता अधिकृत उमेदवार असणार ? अजित पवार गटाच्या राष्ट्रवादीच्या सरोज आहिरे की शिंदे गटाच्या शिवसेनेच्या राजश्री अहिरराव याबाबत उत्सुकता वाढली आहे.

![]()












