जेष्ठ नागरिक व तरुणांचा जोरदार प्रतिसाद

नाशिक : महाविकास आघाडीचे नाशिक मध्य विधानसभा मतदारसंघाचे अधिकृत उमेदवार वसंत गिते यांनी भल्या सकाळी नाशिक शहरातील गोल्फ क्लब आणि इंदिरानगर येथील जॉगिंग ट्रॅक ला येत नागरिकांच्या भेटीगाठी घेतल्या यावेळी जेष्ठ नागरिक व तरुणांची मोठी गर्दी जमा झाली होती. यादरम्यान तरुणांनी वसंत गिते यांच्या समोर अनेक समस्या मांडल्या त्या सोडवण्याचे आश्वासन वसंत गिते यांनी दिले यावेळी गिते यांना जेष्ठ नागरिकांनी आशीर्वाद देत नाशिक मध्य मतदारसंघात परिवर्तन अटळ असल्याचा विश्वास व्यक्त केला . यावेळी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

![]()












