सामूहिक राजीनामे देत केली जाईल अपक्ष उमेदवारी

नाशिक : मध्य मतदारसंघ हा महाविकास आघाडीसाठी डोकेदुखी ठरत असून मध्य मतदारसंघ ठाकरे गटाच्या शिवसेनेच्या वाट्याला गेल्यानंतर कॉग्रेसने आपली आक्रमकता कायम ठेवत आधी नाशिक शहरातील कॉग्रेस भवनाला टाळे ठोकले आणि आता सामूहिक राजीनाम्याचे हत्यार उपसल्याने महाविकास आघाडीत सर्व काही अलबेल नसल्याचे चित्र आहे काल कॉग्रेसच्या प्रवक्त्या डॉ हेमलता पाटील यांच्या निवासस्थानी पत्रकार परिषद आयोजित करण्यात आली होती.
यामध्ये त्या म्हणाल्या गेल्या अनेक निवडणुकांपासून नाशिक मध्यची जागा कॉग्रेसकडे आहे. कॉग्रेसच्या उमेदवारांना चांगल्या प्रकारे मते मिळाली आहेत असे असताना ही जागा ठाकरे गटाला सोडण्यात आली त्यामुळे पक्ष कार्यकर्त्यांचे खच्चीकरण झाले, नाशिक मध्ये चार पैकी एक जागा कॉग्रेसला मिळायला हवी होती त्यासाठी प्रयत्न करत होतो, मात्र आज आमची निराशा झाली पक्षाने आमचा विचार करावा अन्यथा सामूहिक राजीनामे देत अपक्ष उमेदवारी करण्याचा इशारा डॉ हेमलता पाटील यांनी दिला असून या बैठकीला कॉग्रेस सेवा दलाचे अध्यक्ष वसंत ठाकूर, जेष्ठ नेते केशव पाटील, महिला कॉग्रेस जिल्हाध्यक्ष वंदना पाटील, उद्धव पवार, सुरेश मारू, कैलास कडलग जुली डिसूझा उपस्थित होते.

![]()












