मालेगावच्या मतदारांची नावे नाशिकच्या “मध्य” मध्ये आ. फरांदे यांचा आरोप

नाशिक : काही दिवसांपूर्वी नाशिक मध्य मतदारसंघात 24 हजार नावे दुबार असल्याचा आरोप ठाकरे गटाच्या शिवसेनेने केला असतानाच भाजपाच्या मध्य मतदार संघाच्या आमदार यांनी मध्य मतदारसंघात मालेगावच्या मतदारांची नावे घुसवण्यात आल्याचा आरोप केला आहे. काही दिवसांपूर्वी ठाकरे गटाच्या शिवसेनेने तब्बल 24 हजार नावे दुबार असल्याचा आरोप केल्यानंतर लागलीच आ. देवयानी फरांदे यांनी हा आरोप केल्याने निवडणुकीपूर्वीच एकमेकांवर आरोप-प्रत्यारोपाचे चित्र बघायला मिळत आहे यासंदर्भात मागणी करताना आ. फरांदे यांनी 18 हजार दुबार नावासंदर्भात लोकसभा निवडणुकीतनंतर लगेचच संबंधित अधिकाऱ्यांना माहिती दिल्याचे त्यांनी सांगितले. त्यावर काय कारवाई झाली हे मला अजूनही कळाले नाही. मुदतीत अर्ज देऊनही ही नावे वगळण्यात आलेली नाहीत त्याचबरोबर मालेगावमध्ये मतदार असलेल्या 700 लोकांची नावे पुराव्यानिशी दिली आहेत. 1627 मतदारांची नावे, क्रमांक ,फोटो सर्व सारखी असताना ती वगळली गेली नाहीत. वेळेत माहिती व निवेदन देऊनही नावे वगळली गेली नाहीत तर मतदार पुनिरीक्षण कायर्कमाचा फायदा काय ? असाही प्रश्न फरांदे यांनी उपस्थित केला.प्रशासनाच्या कारभाराबाबत त्यांनी संशय व्यक्त करत पुरवणी मतदार यादीत ती नावे जोडण्यात यावीत अशीही मागणी केली असून यासंदर्भात त्यांनी निवेदन देखील दिले आहे.

![]()












