भाजपची पहिली उमेदवार यादी जाहीर

नाशिक : भाजपाकडून उमेदवारांची पहिली यादी जाहीर करण्यात आली असून यामध्ये 99 उमेदवारांची नावे जाहीर करण्यात आली आहेत . यादीत अनेक नव्या चेहऱ्यांना संधी देण्यात आली असून काही ठिकाणी विद्यमान आमदारांची तिकिटे कापण्यात आली आहेत. विधानसभा निवडणुकीचे बिगुल वाजल्यानंतर भाजप या पक्षाने आपल्या उमेदवारांची लिस्ट जाहीर करत बाजी मारली असून भाजपाने नाशिक मधून दोन विद्यमान आमदारांना पुन्हा संधी दिली असून यामध्ये नाशिक पूर्व साठी विद्यमान आमदार राहुल ढिकले तर नाशिक पश्चिम साठी सीमा हिरे या विद्यमान आमदारांवर विश्वास टाकत पुन्हा संधी देण्यात आली आहे.मात्र मध्य नाशिक चा उमेदवार अजून या यादीत जाहीर न केल्याने चर्चेला उधाण आले आहे.त्यामुळे मध्य मध्ये विद्यमान आमदार देवयानी फरांदे असणार की अजून कोणता नवीन चेहरा देण्यात येणार ? नाशिक पश्चिम मतदारसंघात भाजपाच्याच स्वकीयांनी बंडखोरीचा इशारा दिला असताना देखील सीमा हिरे यांना संधी देण्यात आल्याने भाजपा आता आपल्याच बंडखोरांना थंड कसे करणार याकडे राजकिय धुरीणांचे लक्ष लागून आहे.


![]()











